११ ते १४ एप्रिल दरम्यान लस महोत्सवाचे आयोजन

09 Apr 2021 13:30:59
 
 
भारतभरात वेगाने पसरत असलेल्या दुसऱ्या कोरोना लाटेची झळ सगळीकडे बसली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यावर जमेल तितक्या योजना करून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या कालावधीत दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. त्यांनी  विडीओ conferance च्या माध्यमातून राज्यातील मुख्यमंत्र्यांना संबोधित  केले. भारतभर जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लसीचा लाभ घेता यावा यासाठी त्यांनी 'लस महोत्सव' असा कार्यक्रम देशभर राबवण्याची घोषणा केली. 
 
 
narendra modi_1 &nbs
 
येत्या 2-३ आठवड्यात जास्तीत जास्त लसीकरण करून ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.  महात्मा फुले यांची जयंती ११ एप्रिलला आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. त्यानिमित्त लसीकरण महोत्सवाची घोषणा पंतप्रधानांनी केली. संबोधित करत असताना त्यांना इतरही मुद्दे मांडले. मागील वर्षीच्या कोरोनाकाळात आपल्याकडे अनुभव आणि संसाधनांची कमी होती. मात्र या वेळी या गोष्टी  मुबलक प्रमाणात  उपलब्ध असून त्यांचा वापर सर्व राज्यांनी करावा. ‘मायक्रो- कंटेनमेंट झोन्स’वर भर देऊन संसर्ग तिथल्या  तिथेच आटोक्यात आना.
‘चाचणी करा, शोध घ्या, उपचार करा’ या पद्धतीवर मोदी यांनी भर दिला.
 
 
 
जनतेच्या सहभागासह आपले कठोर परिश्रम करणारे डॉक्टर्र्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी परिस्थिती हाताळण्यात फार मोठा हातभार लावला असून अजूनही लावत आहेत, असे ते म्हणाले. ‘अनेक राज्यांमध्ये प्रशासनात शैथिल्य आल्याचे दिसत असून, करोनाबाधितांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे समस्याही वाढल्या आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे’, असे पंतप्रधानांनी सांगितले. अशा परिस्थितीत कोणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्र्यांनी केंद्राशी समन्वयाने काम करावे त्यातूनच करोनावर मात करणे शक्य आहे. ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. अशा गोष्टीवर त्यांनी दृष्टीक्षेप टाकला.  
Powered By Sangraha 9.0