पहिल्या स्वातंत्र संग्रामाचे नायक आणि महान स्वातंत्रसेनानी मंगल पांडे

    08-Apr-2021   
|
 
mangal pande_1  
 
भारतमातेच्या सुरक्षेसाठी लढलेल्या आणि आपल्या प्राणाची काळजी न करता ब्रिटीशांविरूध्द उभे राहिलेल्या अनेक वीरांची नवे इतिहासात अजरामर आहेत. त्यांपैकी एक म्हणजे स्वातंत्रपूर्व ब्रिटीशांच्या हातातील भारतात घडलेल्या पहिल्या स्वातंत्र संग्रामाचे नायक आणि महान स्वातंत्रसेनानी मंगल पांडे यांचा आज बलिदान दिवस. १७५७ मध्ये हे पहिले स्वातंत्र संग्राम घडले आणि ८ एप्रिल १७५७ मध्ये मंगल पांडे यांना ब्रिटीशांनी फाशी दिली होती. मंगल पांडे हे ईस्ट इंडिया कंपनीच्या 34व्या बंगाल इंफेन्ट्रीचे जवान होते. यांच्या धकधकट्या विद्रोहाला घाबरून ब्रिटीशांनी त्यांना ठरलेल्या तारखेच्या १० दिवस आधीच फाशी दिली होती.

ब्रिटीशांच्या या कृतीचा परिणाम म्हणूनच मेरठ सोबत देशातील वेगवेगळ्या जागेवर सैनिकांनी विद्रोह करायला सुरुवात केली होती. मंगल पांडे यांचा जन्म 19 जुलै 1827 मध्ये फैजाबाद च्या सुरुरपुर मध्ये झाला होता. पण मुळात ते उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्याच्या नगवा गाव चे राहणारे होते. १८४९ मध्ये १८ वर्षे या वयात त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या 34व्या बंगाल नेटिव इन्फैन्ट्री मध्ये सैनिक म्हणून भर्ती झाले.

त्यासोबतच भारताला स्वातंत्र मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी ८ एप्रिल १९२९ रोजी दिल्लीच्या सेंट्रल असेंबली वर बॉम्ब फेकले होते. या बॉम्ब फेकण्यामागचा मुख्य उद्देश्य कोणालाही मारण्याचा नव्हता तर फक्त ब्रिटीशांसाठी एक चेतावणी होती. आजच्याच दिवशी सन १८९४ मध्ये वंन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत लिहणारे बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय यांचा मृत्यू झाला होता. अमित शहा यांनी ट्वीट करून मंगल पांडे आणि बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय यांच्या कार्याबद्दल नमन केले.