छत्तीसगड राज्यातील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांची नक्षलवाद्यांसोबत चकमक

    05-Apr-2021   
|

shahid_1  H x W
 
भारतमातेची सुरक्षा करत असताना जवान शहीद झाले की दुःखही होते आणि अभिमानही वाटतो. अशीच एक घटना छत्तीसगढमध्ये घडली आहे. सुकमा आणि बिजापूर हे छत्तीसगढचे अतिदक्षिणेकडील जिल्हे आहेत. काही दिवसांपासून या भागात मोठ्या संख्येने नक्षलवादी गस्त घालत असल्याचे समजले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्री पासून छत्तीसगड राज्यातील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे(CRPF) कोबरा बटालियन(COBRA), डीआरजी(DRG) आणि एसटीएफच्या(STF) संयुक्त दलाने नक्षलवादी विरोधी अभियान सुरू केलं होतं. या जिल्ह्यांच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले.
या घटनेत 15 जवान बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना बीजापूर आणि रायपूरच्या रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे. या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले  आणि एका नक्षलवादी महिलेचे प्रेत सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. देशात या घटनेने शोककळा पसरली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी त्याचा आगामी आसामचा दौरा रद्द करून छत्तीसगढमध्ये जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहली. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.