पालघर साधु हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण…! निकाल काय ?

    16-Apr-2021
|

वर्ष २०२०, तारीख १६ एप्रिल | अचानक एक व्हिडियो व्हायरल होतो, ज्यामध्ये महाराष्ट्रातील पालघर येथे भगवे वस्त्रधारी दोन साधुंची दगडाने ठेचून ठेचून हत्या केली असल्याची दिसते. या व्हिडियो मध्ये पोलिसही दिसतात, अगदी एक पोलिस त्या वयोवृद्ध साधुला जमावासमोर हात सोडून ढकललेला ही दिसतो. आणि अचानक पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात होते. आठवतं? या संपूर्ण घटनेला एक वर्ष झालं. आणि आजतागायत या साधुंची ठेचून हत्या करणाऱ्या लोकांना काय शिक्षा देण्यात आली ? हे समान्य माणसाला माहीत नाही ? आहे ना वाईट ?


Palghar_1  H x


तर घटना अशी होती कि, कल्पवृक्ष गिरी महाराज (वय ७० वर्षे) आणि सुशील गिरी महाराज (वय ३५ वर्षे) आपल्या वाहनचालक नीलेश तलगाडे सोबत पालघर येथील गढचिंचले गावातून जात होते. अचानक ५०० लोकांच्या समूहाने त्यांना घेरले, आणि त्यांच्यावर हल्ला चढवला, जवळच पोलिस ठाणा देखील होता, साधुंना पोलिस ठाण्यात नेण्यात आले, मात्र पुढे काय झाले हे आपण सगळ्यांनी त्या व्हिडियो मध्ये बघितलेच आहे. हे देन्हीही साधु वाराणसीतील एका मोठ्या अखाड्याशी संलग्न होते, धर्माचे आचरण करणारे, आणि हिंसेला पाप समझणारे होते, मात्र त्यांच्यासोबत काय झाले ? त्यांची निर्मम हत्या करण्यात आली.


हे देखील वाचा...

या घटनेच्या काही दिवस आधी, पालघर येथे एक बातमी पसरली होती, कि या भागात काही मानव तस्कर फिरताएत, पोलिसांच्या म्हणण्यानुसार पालघर येथील या साधुंना तस्कर समजण्यात आले, आणि म्हणूनच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कितीही काहीही असले तरी आपण या हल्ल्याचे समर्थन करु? ते ही मानव तस्कर समजले म्हणून ? या पेक्षा भीषण असेल ते काय?

या संपूर्ण प्रकरणात उद्धव सरकारचे दुर्लक्ष, पोलिसांचा नाकर्तेपणा आणि या भागात पसरलेले मिशनरी जहर आणि हिंदूंविरोधात तयार करण्यात आलेले वातावरण या दोन निष्पाप साधुंचा बळी जाण्यास कारणीभूत ठरले. ५००च्या जमावापैकी साधारण २०० लोकांची चौकशी करण्यात आली, त्यापैकी १८२ लोक आज जामीनावर बाहेर आहेत, आणि त्यांच्यावर पुढे कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.

  

हे प्रकरण सीआयडी कडे देण्यात आले. अनेक पोलिसांच्या बदल्या झाल्या, अनेकांची चौकशी झाली, मात्र न्याय ? अजून मिळालेला नाही.

तो मिळणारही कसा ? ज्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख स्वत: या कारणाने राजीनामा देतात, कि त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्या राज्यात सर्व आलबेल असेलही कसं? महाराष्ट्रात एका पत्रकाराला त्याची चूक नसताना, जुने कुठलेतरी प्रकरण काढून मुद्दाम त्याचा छळ केला जातो, त्याला देशद्रोही किंवा आतंकवाद्यासारखी वागणूक देण्यात येते, एका अभिनेत्रीचे घर मुद्दाम पाडण्यात येते ते ही असेच जुने प्रकरण उकलून काढून, मात्र दोन निष्पाप साधुंची जेव्हा मॉब लिंचींगमुळे हत्या होते, आणि त्याचा पुढे साधा तपासही नीट होत नाही, तेव्हा मात्र संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकते.

आज या प्रकरणाला १ वर्ष लोटले आहे. आणि आजही ट्विटरवरून अनेक लोक या साधुंसाधी न्याय मिळावा अशी मागणी करताएत. या सरकारने काही नाही केले, मात्र या साधुंना न्याय मिळवून दिला, तरी बाळासाहेब ठाकरे वरुन आशीर्वाद देतील, कारण हिंदुहृदय सम्राटांच्या, साधु संतांच्या महाराष्ट्रात अशी किळसवाणी घटना घडणं, हे महाराष्ट्राला काळिमा फासणारं आहे.

या साधुंना न्याय मिळावा हीच या महाराष्ट्राची इच्छा आहे…!

- निहारिका पोळ सर्वटे