कोरोना लसीकरण २४ तास उपलब्ध

    04-Mar-2021
|
 
 
CORONA _1  H x
 
भारतात जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारी पासून झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आणि कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतरच्या टप्प्याची सरुवात १ मार्च पासून करण्यात आली. त्यामध्ये ६० वर्षावरील जेष्ठ व्यक्ती व ४५ वर्षाखालील व्यक्तीला सह्व्याधी असल्यास लस दिली जाणार आहे.

CORONA _1  H x
 
१ मार्च पासून सुरु झालेल्या दुसरा टप्प्यामुळे संपूर्ण देशात अनेक ठिकाणी जेष्ठ नागरिकांची गर्दी वाढायला लागली आहे. त्यासोबतच Co-WIN App मधील गोंधळामुळे लोकांना उन्हात ताटकळत उभं रहाव लागत आहे. त्यात मुखत्वे जेष्ठ नागरिकांचा समावेश असल्यामुळे गैरसोय होत आहे. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारकडून आरोग्य मंत्र्यांनी बुधवारी ट्वीट केले.


'लाभार्थींना अडचणींविना लस मिळावी तसेच मोहिमेचा वेग वाढावा म्हणून लसीकरण २४ तास उपलब्ध होईल असं आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्याचे मूल्य जास्त वाटते, त्यामुळे आता देशातील लोकांना कुठल्याही वेळी  कोरोना लसीकरणाची सुविधा देण्यात येईल' असं आरोग्य मंत्र्यांनी बुधवारी ट्वीट केले.