गरीब विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या धनश्रीला आहे आपल्या मदतीची गरज…!

    16-Mar-2021   
|

पुण्यातील रानडे इंन्स्टीट्यूट येथील माजी विद्यार्थिनी, यूपीएससीची विद्यार्थिनी, गरजू मुला मुलींना शिकवणारी, आणि समाज कार्यात पुढे असलेल्या धनश्री कुंभार हिला २ मार्च रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात तिच्या मेंदूला मार लागला असून सध्या ती नवले हॉस्पिटल येथे कोमा मध्ये आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत, आणि सध्या तिला आणि तिच्या परिवाराला मदतीची आवश्यकता आहे.


Dhanashree_1  H


२ मार्च रोजी सकाळी अभ्यासासाठी लायब्रेरीला जाताना, धनश्री हिला भरधाव रिक्षाने उडविले आणि त्यात तिला मार लागला. तिला आधी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर तिला नवले रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तिच्या उपचारासाठी १५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. आणि धनश्रीच्या मित्र मैत्रीणींनी मिळून ही रक्कम उभी करण्याचे ठरविले आहे. त्यालाठी या लिंकवर क्लिक करा आणि अधिक माहिती जाणून घ्या.केवळ २७व्या वर्षी अशा भीषण अपघातामुळे ती व्हेंटिलेटर वर आहे, आणि रोज मृत्युशी झुंझ देतेय. एका होऊ घातलेल्या ऑफिसर सोबत असे होणे हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्या रिक्षाने धनश्रीला उडविले तिचा अद्याप पत्ता लागलेला नाही. मात्र धनश्रीचे कुटुंब तपास करण्याच्या प्रयत्नात आहे.

वरील दिलेल्या लिंकवर जाऊन आपण धनश्रीला मदत करू शकता, तसेच तिच्या कुटुंबाला आधार देऊ शकता. धनश्री लवकर बरी व्हावी यासाठी सर्व मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे.