राज्यसभेत गुलाम नबी आझादांच कौतुक करताना पंतप्रधानांचे डोळे पाणावले

    09-Feb-2021
|


 
PM Modi emotional speech
 
 

आज राज्यसभेतुन काही खासदार निवृत्त झाले आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील आणखी चार सदस्यांचा कार्यकाळ आज संपला आहे.या सदस्यांना राज्यसभेतून निरोप देण्यात आला.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला. गुलाम नबी आझादांचे कौतुक करताना मोदी भावुक झालेत.

नरेंद्र मोदी आझाद यांच्याबद्दल बोलताना म्हणाले कि, गुलाम नबी आझाद त्यांच्या घरच्या बागेला असं सांभाळतात कि, ती बाग काश्मीरची आठवण करून देते.त्याचबरोबर मोदींनी एक अनुभव सांगितलं तो असा कि, गुजरातच्या यात्रियांवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा गुलाब नबी आझाद यांचा सगळ्यात पहिला फोन मोदींना गेला. तेव्हा तो फोन सूचना देणारा नव्हता तर त्यावेळी गुलाब नबी आझाद यांचे अश्रूच थांबत नव्हते.

त्यावेळी प्रणव मुखर्जी संरक्षणमंत्री होते. गुलाब नबी आझाद यांनी विमानतळावरून फोन करून सैन्य आणि विमानाची मागणी केली. ज्याप्रमाणे घरातील एखाद्या व्यक्तीची काळजी आपण करतो त्याचप्रमाणे आझाद यांनी त्या सर्व यात्रेकरूंची काळजी घेतली. हा अनुभवही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितला.