मानधन मिळत नाही, म्हणून कलाकारांनी उठवला आवाज

    23-Feb-2021
|

कलाकृति कुठलीही असली, तरी त्यासाठी कलाकार, निर्माता, दिद्गर्शक आणि अगदी स्पॉट दादा पासून सगळे भरपूर मेहनत करतात. मात्र जर या कलाकारांना वेळेवर मानधन मिळाले नाही, तर ते चिडणार नाहीत का ? कलर्स मराठी वर सुरु असेलली, मालिका “सुखांच्या सरींनी हे मन बावरे” ही काही दिवसांपूर्वीच संपली. मात्र मालिका संपून चार महीने झाले तरी देखील त्यात काम करणाऱ्या कलाकारांना मानधन मिळाले नसल्याची तक्रार कलाकारांनी उघडपणे केली आहे, आणि त्यावरून वाद विवाद सुरु आहेत.

man bawre_1  H


या मालिकेत काम करणारे शशांक केतकर, मृणाल दुसानिस, शर्मिष्ठा राऊत, संग्राम समिळ यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून या विषयाकडे जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी निर्माता मंदार देवस्थळी यांना लवकरात लवकर त्यांचे मानधन मिळावे यासाठी या निवेदनातून म्हटले आहे, त्यांच्या मते मंदार देवस्थळी एक खूप चांगली व्यक्ति आहे, मात्र एक व्यावसायिक म्हणून कलाकारांचे मानधन वेळेवर व्हावे अशी विनंती त्यांनी केली आहे. माणूसकीच्या नात्याने आम्ही देखील खूप वेळेला मदत केली, मात्र आता पाणी डोक्यावरुन गेले असल्याचे या कलाकारांनी म्हटले आहे.तसेच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे, मंदार देवस्थळी यांनी देखील सोशल मीडिया वर निवेदन केले आहे कि, ते सध्या खूप मोठ्या आर्थिक बिकट परिस्थितीतून जात आहेत, त्यांनी मान्य केले आहे कि, त्यांच्या कडून या कलाकारांचे मानधन थकले आहे, तसेच ते अगदी टॅक्स सकट सगळ्यांचे पैसे देतील मात्र त्यांना थोडा वेळ हवा आहे, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लॉस झाला आहे, आणि ते परिस्थिती बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. असे त्यांनी त्यांच्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्ट मध्ये म्हटले आहे.एकूण सध्या कोरोनामुळे एंटरटेंमेंट इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणात समस्या सुरु आहेत. आणि अनेक निर्मात्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या नाण्याच्या दोन्ही बाजू बरोबर आहेत, आणि या परिस्थितीचा ताण हा प्रत्येकावरच पडला आहे, असे दिसून येत आहे.