पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा

19 Feb 2021 16:55:43

गेल्या काही दिवसपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतींमुळे सामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हि करवाढ राज्य सरकारकडून आहे कि, केंद्र सरकारकडून हे माहित नसल्यानेही अनेकांचा गोंधळ उडत आहे. अशातच नेटिझन्सही आपापली मते वेगवेगळ्या माध्यमातून मांडत आहे.
 
 
 
 
त्याचबरोबर भाजपचे मंत्री पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे मोदींचे आभार मानत आहेत. तर विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहेत. या दरवाढीसंबंधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आपले मत व्यक्त करण्यासाठी ट्वीटरवर दोन ओळींची शेरोशायरी करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
 
या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘जून २०१४ मध्ये भाजपचं सरकार आलं, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती ९३ डॉलर होत्या. तेव्हा पेट्रोलची किंमत ७१ तर डिझेलची किंमत ५७ रुपये प्रतिलिटर होती. मागील ७ वर्षांत कच्च तेल ३० डॉलरने स्वस्त झालं आहे. पण तरीही पेट्रोल सेंच्युरी करत आहे आणि डिझेल त्याच्या पाठोपाठ जातंय’, अस ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
 
त्याचबरोबर २०२१ या वर्षात १९ वेळा ही दरवाढ झाली असून १५ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या काळात पेट्रोल १७.०५ तर डिझेल १४.५८ रुपयांनी महाग झालं आहे, हि आकडेवारी देखील राहुल गांधी यांनी सादर केली आहे.
Powered By Sangraha 9.0