काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन

18 Feb 2021 12:42:07
 
satish sharma _1 &nb
 
 
 
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच गांधी कुटुंबाचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे कॅप्टन सतीश शर्मा यांचं गोव्यात निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. तीन वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या कॅप्टन सतीश शर्मा यांनी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं.
 
 
 
 
कॅप्टन सतीश शर्मा यांना कॅन्सर झाला होता, त्याचबरोबर ते आजारीदेखील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.कॅप्टन सतीश शर्मा हे राजीव गांधी यांचे निकटवर्तीय होते. पी व्ही नरसिम्हा राव यांच्या सरकारमध्ये कॅप्टन सतीश शर्मा यांच्याकडे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय देण्यात आलं होतं.
 
 ११ ऑक्टोबर १९४७ रोजी आंध्रप्रदेशमधील सिकंदराबादमध्ये सतीश शर्मा यांचा जन्म झाला.राजीव गांधींमुळे ते राजकारणात आले. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये शर्मा अमेठीमधून निवडून आले होते.१९९८ ते २००४ दरम्यान शर्मा रायबरेलीचे खासदार होते. कॅप्टन सतीश शर्मा यांच्या निधनावर काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0