रामदास आठवलेंचा राहुल गांधींना ‘हम दो, हमारे दो’वरून सल्ला

    17-Feb-2021
|

काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या ‘हम दो हमारे दो’ या धोरणावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. “हम दो, हमारे दो’चे हे सरकार आहे, चार पाच जणच फक्त हे सरकार चालवतात आणि त्यांची नावे सर्वाना माहित आहेत'', अशा शब्दात राहून गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.
 
 
 
 
 
‘हम दो, हमारे दो’ या राहुल गांधींच्या वाक्यावर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी राहुल गांधींना एक सल्ला दिला आहे.“हम दो, हमारे दो” च्या घोषणेचा वापर पूर्वी कुटुंब नियोजनासाठी केला जात होता.
 
जर त्यांना (गांधींना) या घोषणेचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी आधी लग्न करायला पाहिजे, आणि लग्न करायचं असेल तर त्यांनी दलित मुलीशी करावं आणि महात्मा गांधींचं जातीयवाद हटवण्याचं स्वप्न पूर्ण करावं. राहुल गांधींच्या या कृतीतून तरुणांना प्रेरणा मिळेल”, असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले आहेत.