फ्लाईट लेफ्टिनेंट भावना कांत आणि राजपथावरील परेड!

    25-Jan-2021
|

- Priyanka Kamble 

"कुछ करना हो तो, आसमान मे उडना बेस्ट ऑपशन हैं!"- फ्लाईट लेफ्टिनेंट भावना कांत.

आंतरराष्ट्रीय महिला दिवस या निमित्ताने भारतीय वायु सेनेच्या पहिल्या तीन महिला लढाऊ विमान पायलट म्हणून भावना कांत, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले तेव्हा उद्गारण्यात आलेले हे वाक्य खूपच प्रेरणादायी!

Bhavna Kant_1  

2015 मध्ये भारतीय वायु सेनेने एक ऐतिहासिक निर्णय घेत महिलांना combat role मध्ये सहभागी करून घेतले आणि वायुसेनेमध्ये सहभागी असलेल्या महिलांच्या आयुष्यात नवी वाटचाल सुरू झाली. त्यांच एक यश म्हणजे फ्लाईट लेफ्टिनेंट भावना कांत 2021 च्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय वायुसेनेकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परेडचा एक भाग असणार आहे . ज्याची थीम 'मेक एक इंडिया' आहे. फ्लाईट लेफ्टिनेंट भावना कांत हि भारताची पहिली महिला फ्लाईट लेफ्टिनेंट असेल जिला प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये वायु सेनेचा भाग म्हणून सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. अशी गोष्ट भारताच्या इतिहासात पहिल्यांदा होत असल्याने निश्चितच महिलांसाठी आणि भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असणार आहे.

 
 
भावना कांत मुळची दरभंगा, बिहारची. तिचा जन्म १ डिसेंबर १९९२ मध्ये झाला. तिचे वडील तेज नारायण कांत इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर
असून इंडियन ऑयल कंपनी मध्ये कार्यरत आहेत. लहानपणापासुन जे स्वप्नं पाहिलं ते पूर्ण झालं याचा त्यांना अभिमान आहे.
 
Bhavna Kant_1  

परंपरागत पुरुषप्रधान जगामध्ये भावना कांतने लिंगभेदाच्या बेड्या तोडत जगाला दाखवून दिलं की जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी महिला करू शकत नाही. जगातील 195 पेक्षा अधिक देशांपैकी फक्त 15 देशांमध्ये महिलांना combat मिलिटरी roles मध्ये सहभागी होण्याची अनुमती आहे. त्यात भारताचा समावेश होतो यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते का? निश्चितच नाही!अशाप्रकारे अजूनही मोठ्या प्रमाणावर लिंगभेद करत असलेल्या समाजांमध्ये विशेष करून भारतीय उपखंडामध्ये जिथे महिलांना जगताना वेगवेगळ्या अन्यायाला समोर जावं लागते त्या देशांनी आणि समाजाने यातून निश्चितच बोध घेतला पाहिजे.

म्या वेळी परेड मध्ये दोन गोष्टी आकर्षण खेचून घेतील एक म्हणजे यावर्षी नुकताच वायु सेनेचा भाग बनलेले भव्य दिव्य असे राफेल विमान आणि दुसरा म्हणजे भारत की बेटी फ्लाईट लेफ्टिनेंट भावना कांतची राजपथावर वायु सेनेची छबी.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ती राफेल आणि सुखोई याशिवाय इतर लढाऊ विमान उडवण्यात पसंती दर्शवेल. भारतीय वायु सेना या दरम्यान एलसीए तेजस, लाइट कॉमबॅट हेलिकॉप्टर, रोहिणी रडार, आकाश मिसाईल आणि सुखोई 30 एमकेआयचे प्रदर्शन करणार आहे. अशी अभूतपूर्व संधी मिळाल्याने ती अत्यंत आनंदीत आहे. माध्यमांशी बोलताना तिने सांगितलं की," प्रत्येक वर्षी मी परेड टीवी वर पाहत असते, या वेळी मी स्वतः या परेड मध्ये शामिल होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे." 
 
Bhavna Kant_1  

यावेळी परेड मध्ये दोन गोष्टी आकर्षण खेचून घेतील एक म्हणजे यावर्षी नुकताच वायु सेनेचा भाग बनलेले भव्य दिव्य असे राफेल विमान आणि दुसरा म्हणजे भारत की बेटी फ्लाईट लेफ्टिनेंट भावना कांतचा समावेश असलेली राजपथावर वायु सेनेची छबी!