“ढसा ढसा रडावसं वाटतंय !!” सिद्धार्थ जाधव यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना

    25-Sep-2020
|

मुंबईत दरवर्षीच प्रचंड पाऊस पडतो, आणि मग या महानगराची परिस्थिती अधिकच वाईट होते. २६ जुलैचा पाऊस तर आपण आज तागायत विसरू शकलेलो नाही. तर या वर्षी देखील मुंबईत प्रचंड पाऊस पडलेला आहे, आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झालेली आहे, मुंबईत अनेक नाट्यगृहांमध्ये पाणी शिरले आहे, आणि त्याचे फोटोज इंटरनेट वर व्हायरल होत असल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे, यावर प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या ट्विटर खात्याच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.


Sid_1  H x W: 0


ते लिहीतात, “शाळेच्या गॅदरिंगपासून ज्या स्टेजवर उभा रहायला शिकलो, नाटकं पाहिली, भरलेल्या प्रेक्षकांच्या साथीनं प्रयोग केले, त्या नाट्यगृहाचे असे फोटोज पाहून ढसा ढसा रडावसं वाटतंय. भरुन आलंय.. २०२०चा हा संकटकाळ अधिक कठीण होतोय. ते पहावत नाही. सर्वांसाठी प्रार्थना, काळजी घ्या.”

अशा मार्मिक शब्दांमधून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचा नंबर कोविडमध्ये पहिला असल्याने महाराष्ट्राच्या जनतेला सध्या खूप हाल सहन करावे लागत आहेत, त्यातून वाढलेला पाऊ, पूर सदृश्य परिस्थिती, अनेक संकटे एकत्रच जणू महाराष्ट्रावर आली आहेत. सिद्धार्थ जाधव प्रमाणे महाराष्ट्राच्या प्रत्येकच नागरिकाच्या मनात अशा भावना असतील असे म्हणणे वावगे ठरणार नाही.