प्रणब दा !!! श्रद्धांजली.. ट्विटर वर अनेकांनी वाहिली श्रद्धांजली !!

    01-Sep-2020
|

काल देशाचे माजी राष्ट्रपती आणि एक कुशल राजकीय व्यक्तिमत्व भारतरत्न प्रणब मुखर्जी यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकीय क्षेत्रात एक कधीच न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यावर संपूर्ण देशाचे प्रेम होते. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज मंडळींनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


pranab da_1  H


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लिहीले आहे कि, “भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या जाण्याने देशात शोकलहर आहे. ते देशाच्या विकासाचा एक भक्कम पाया होते. भारताच्या संपूर्ण राजकीय वर्तुळात ते सर्वांचे लाडके होते. त्यांनी राष्ट्रपती भवनाला एक संस्कृति, साहित्य, कला, शिक्षण, विज्ञान याचे केंद्र बनवले. २०१४ मध्ये दिल्ली माझ्यासाठी नवीन होती, अगदी पहिल्या दिवसापासून मला त्यांच्या सान्निध्यात काम करण्याचा अनुभव आणि त्यांचे आशीर्वाद मिळाले.” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट केले कि, “माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणब मुखर्जी यांनी गेली अनेक दशके देशाच्या भविष्यासाठी आणि विकासासाठी अविरत कार्य केले. सत्तेत असू देत किंवा विरोधी पक्षात त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन काम केले. देशाच्या विकासात त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही.”अभिनेता अक्षय कुमार याने देखील आपल्या भावना व्यक्त करत सांगितले कि, “प्रणब मुखर्जी यांच्या जाण्याने एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, त्यांचे योदगान कधीच विसरणे शक्य नाही. माझे नशीब बलवत्तर होते कि मला त्यांच्या सोबत हा क्षण जगता आला.”


प्रसिद्ध सँडआर्टिस्ट सुदर्शन पटनाईक यांनी आपल्या कलाकृतितून भारतरत्न प्रणब मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

याशिवाय अनेक कलाकारांनी आणि प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रणब दा यांच्या जाण्याने भारतीय राजकीय क्षेत्राची कधीच पूर्ण न होऊ शकणारी अशी क्षति झाली आहे.