सुबोध भावे आणि परिवार कोरोना पॉझिटिव्ह, घरीच क्वारंटाईन

    31-Aug-2020
|

आपल्या सगळ्यांचे लाडके सुबोध भावे यांना देखईल आता कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले कि, ते त्यांची पत्नी व त्यांचा मोठा मुलगा कान्हा, यांना कोरोनाची लागण झाली आहे, तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ते उपचार घेत आहेत, त्यांनी स्वत:वा घरीच क्वारंटाइन केले आहे.त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये भिती आणि निराशेचे वातावरण आहे. त्यांचे फॅन्स त्यांच्या उत्तम प्रकृतिसाठी प्रार्थना करत आहेत.


bheva_1  H x W:


सुबोध भावे हे लॉकडाउन काळात सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह होते. त्यांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून अनेक पोस्ट्स या काळात शेअर केल्या. मात्र त्यांच्या कोरोना ची लागण झाल्याची पोस्ट बघितल्यावर त्यांच्या चाहत्यांना मात्र वेदना झाल्या आहेत.याआधी अमिताभ बच्चन आणि परिवार, अनुपम खेर यांचा परिवार यांना देखील कोरोना झाला होता, मात्र ते उपचार घेऊन बरे होऊन आपल्या घरी परत आले आहेत. सुबोध भावे आणि त्यांचा परिवार देखील लवकरच बरा व्हावा, आणि ते लवकरच पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर ठणठणीत उभे असावे अशी प्रार्थना त्यांचे चाहते करत आहेत.