ओम राऊतच्या नव्या चित्रपटात दिसणार ‘बाहुबली’ प्रभास

18 Aug 2020 18:25:20

नुकत्याच आलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या तान्हाजी या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांचा नवीन चित्रपट लवकरच येत आहे, या चित्रपटाचे नाव आहे ‘आदिपुरुष’ आणि या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे सगळ्यांचा लाडका बाहुबली म्हणजेच ‘प्रभास’. आज प्रभास ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे, त्यामुळे मराठमोळ्या ओम राऊतचे आणि दाक्षिणात्य प्रभासचे फॅन्स या नवीन बॉलिवुड चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.


Prabhas_1  H x


या चित्रपटाचे निर्माते आहेत टीसीरीज चे प्रमुख भूषण कुमार, आणि या चित्रपटात आदिपुरुषाच्या भूमिकेत असेल प्रभास. हा चित्रपट २०२२ मध्ये हिंदी, तेलगु, तामिळ आणि मल्याळी भाषेत येणार आहे. प्रभासने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहीले कि, ‘वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण’ |



असं म्हटल्या जातं आहे कि हा चित्रपच रामायण किंवा प्रभु रामचंद्रांवर आधारित आहे. नुकतेच देशात मारमंदिराचे पूजन झाले आहे. राममंदिर निर्माणाच्या काळात जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर प्रेक्षकांचा त्याला आणखी जास्त प्रतिसाद मिळेल, असेही सांगण्यात येत आहे. 

तान्हाजी नंतर आता ओम राऊतच्या दिग्दर्शनात ऐतिहासिक चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. यामध्ये देखील व्हीएफएक्स आणि इतर मोठ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, तसेच कोविडचा काळ जर तोवर संपला तर प्रेक्षकांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघता येणार असल्याने ते आनंदित आहेत.

Powered By Sangraha 9.0