आगळी वेगळी डान्स अंताक्षरी :

    16-Jun-2020
|

नृत्य म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच डोळांपुढे एक सुंदर चित्र उभं राहतं. त्यातून मराठी तारका नृत्य सादर करणार असतील, तर मग काय विचारता | मात्र नुकतेच ५ मराठी तारकांनी सादर केलेलं नृत्य म्हणजे काही साधं नृत्य न्वहती. ती होती “डान्स अंताक्षरी”. 5 मराठी कलाकार म्हणजे मयुरी वाघ, गौतमी देशपांडे, शर्मिष्ठा राऊत, विदिशा म्हसकर आणि सायली परब शेलार या प्रतिभावान, सुंदर अभिनेत्रींसह एक आगळंवेगळं सादरीकरण नुकतच मिरीयाड आर्ट्सच्या युटूब चैनल वर प्रदशित झालं आहे. आणि हे सादरीकरण होतं “डान्स अंताक्षरी”


Dance Antakshariu_1 

आजच्या या तणावपूर्ण परिस्थितीत आपल्या लाडक्या अभिनेत्री, रोजची धावपळ, सहकलाकार, त्यांचा वैविध्यतेने नटलेला सेट, मुख्य म्हणजे रसिक चाहते या सगळ्यांना मिस करताहेत. म्हणूनच आपल्या चाहत्यांसाठी,त्यांच्या चेहऱ्यावर या तणावातून थोडावेळ का होईना हसू खुलवण्यासाठी हे क्षण टिपण्याचा प्रयत्न केला आहे. नृत्यातून त्यांनी अंताक्षरी सादर केली आहे.
“बैठे बैठे क्या करे ....या चारोळीने आपली अंताक्षरी चालू होते. आपली अंताक्षरी गाण्याची असते. पण आज ही अंताक्षरी डान्सची आहे हं! या व्हिडिओत तुम्ही तुमच्या आवडत्या अभिनेत्री चा डान्सची अगदी म्युझिकसह मजा लुटणार आहात, तेव्हा घरीच रहा... सुरक्षित रहा.” असा संदेश मिरियाड आर्ट्स आणि या अभिनेत्रींने दिला आहे.

Lockdown च्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींना घेऊन केलेले विशेष सादरीकरण तसेच नृत्यदिग्दर्शन मिरीयाड आर्ट्स यांनी केलं आहे.