unplugged music.. एका आर्टिस्टची कहाणी..

    09-May-2020
|

- नेहा भोळे (जावळे)

आयुष्यात नेहमी आपलं करियर घडवतांना आपल्या छंदांना कुठेतरी बाजूला सारून जीवनाच्या शर्यतीत प्रवाहानुसार वाहव लागत परंतु कुठेतरी मनात ती इच्छा असतेच ती म्हणजे छंदाला जोपासण्याची...परंतु जर त्याच छंदाला आपण करियर म्हणून जपलं तर...!मज्जा येईल की नाही आयुष्य जगायला? गोष्ट जरा हटके आहे पण तेवढीच खरी सुद्धा चला तर जाणून घेऊयात नव्या करियरची गोष्ट...

 


neha_1  H x W:


जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी स्वप्न असते परंतु काहीतरी हटके करून दाखवणाऱ्यांची संख्या त्यात कमीच त्यामध्ये प्रामुख्याने आपण घेतलेले शिक्षण कुठेतरी उपयोगी पडेल आणि त्यामध्येच करिअर घडेल असं काहीस घडतांना दिसत असतं. परंतु या गोष्टीत थोडं वेगळं घडलंय...

 


neha_1  H x W:


प्रणय, रोहन आणि नयन या तिघा मित्रांनी ३ वर्षा आधी एक unplugged music Band बनवला ज्यामध्ये मराठी, हिंदी चित्रपट गाण्यांना कव्हर करून ते परफॉर्म करायचे काही काळानंतर या त्यांच्या नवीन कल्पनेला लोकांनी चांगलेच प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या हटके प्रेसेंटेशनच्या चर्चा पण जागो जागी रंगायला लागल्या. काही काळानंतर त्यांनी unplugged band ला PRANAY G . हे नाव देऊन प्रसिद्धी मिळवली. पुढे त्यांच्या या कामाला नवी ओळख मिळत गेली आणि १ नोव्हेंबर रोजी 'द हार्ड रॉक कॅफे' मुंबई येथे त्यांनी परफॉर्म देखील केलं.

स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी लागणारी जिद्द आणि त्या मागे केलेली मेहनत ही नेहमीच आपल्या कामाचं फळ देत असते. PRANAY G या बँडमध्ये स्वतः प्रणय गोमाशे हा मुख्य गायक आहे. प्रणय मूळचा विदर्भामधील चंद्रपुर या शहरातील असून शिक्षणासाठी मुंबई येथे वास्तव्यास आहे. एम.कॉम. केल्यानंतर आपल्या छंदाला करियर बनवायचे त्याने ठरवले. एम. ए. म्युझिक सोबतच साध्यावत जयपूर कुवरश्याम घराण्याचे जेष्ठ गायक पं.मुरली मनोहर शुक्ल गुरुजी यांच्याकडून तो सध्या गायकीचे धडे गिरवत आहे. तसेच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांच्या कडून मार्गदर्शन देखील घेत आहे. आजपर्यंत भारतभर गायनाचे कार्यक्रम प्रणयने सादर केले असून त्यात प्रामुख्याने इंटरनॅशनल आर्ट ऑफ लिविंग सेंटर बंगलोर, कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, कोक स्टुडिओ प्रो नाईट, डि वाय पाटील स्टेडियम येथे विनोद बी प्रोजेक्टच्या माध्यमातून, विविध राष्ट्रीय व राज्य स्तरीय युवा महोत्सव आणि देशातील अनेक ठिकाणी अभंग भावगीत, हिंदी मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातून आपली कला प्रणयने उत्तमरीत्या सादर केली आहे.

त्या सोबत रोहन झोडगे हा मूळचा अंबरनाथ येथील असून band मध्ये लीड गिटार प्ले करतो. डिप्लोमाच शिक्षण घेऊन आपल्या छंदाला त्याने करियर म्हणून निवडलं. संगीत जगतातील नामवंत कलाकारांसोबत त्याने साथ केली असून त्यात प्रामुख्याने हर्षदीप कोर, कविता सेठ, पवनी पांडे तसेच कप्पा टीव्ही, फिफा वर्ल्ड कप, रेट्रो एफ एम, कोक स्टुडिओ प्रो नाईट सारख्या अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत शिवाय निरनिराळ्या प्रसारमाध्यमातून ह्या कार्यक्रमांचे प्रक्षेपण देखील करण्यात आले होते.


neha_1  H x W:


याच ग्रुपमधील नयन मोरे हा कल्याणचा असून सध्या एम.बी .ए. च शिक्षण घेत आहे. सोबतच त्याचा रिदमचा ठेका अचूक पकडण्याचा छंद त्याला नवी ओळख देतोय, नयनबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे तो एका हातानी अपंग असून त्यावर त्याने मात करत जगण्याची नवी उमेद लोकांपर्यंत पोहोचवली आहे. नयनने आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक स्पर्धेत क्रमांक पटकावला असून मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनाचे आणि नियोजनाचे काम सुद्धा चोखपणे बजावण्याचे कौशल्य त्याने अवगत करून घेतले आहे.

त्याच प्रमाणे pranay g या बँडमध्ये कीबोर्ड वर श्रीजित बॅनर्जी बेस गिटारवर रोझारिओ लोबो ड्रम्सवर स्वप्नील मोरे तसेच सह गायक म्हणून नवल कुलकर्णी, सुरुची दीक्षित आहेत. सल्लागार म्हणून नामवंत गिटार वादक, संगीत दिग्दर्शक विनोद बनसोडे आदी समस्त मित्रमंडळी असतात. सगळी मंडळी आपापल्या कामातील नामवंत कलाकार आहेत. नुकताच या बँडने [email protected] कॅफे मध्ये सादरीकरण केले आहे भविष्यात या बँडला अनेक नावलौकिक प्राप्त होईल यात शंका नाही. शेवटी हेच की जर काम आपल्या आवडीचं असेल तर नक्कीच ते करायला अधिकाधिक मज्जा येते.

या सगळ्या ग्रुपचे हे स्वप्न होते आणि आता ते पूर्ण होणार असल्याने यांना नक्कीच पुढील ओळी आठवत असणार...'किसी चीज को पुरी शिद्द्त से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती हैं.'...


नेहा जावळे.