करण जौहर यांच्या घरी ‘या दोघांना’ झाला कोरोना...

    26-May-2020
|

कालच प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जौहर यांनी आपला वाढदिवस साजरा केला आणि आज त्यांच्या घरात दोन कोविड-१९ पॉजिटिव्ह रुग्ण सापडले असल्याची माहिती खुद्द करण यांनी दिली आहे. त्यामुळे आता हा रोग सेलिब्रिटीजच्या घरी देखील जाऊन पोहोचला आहे. करण यांच्या घरात काम करणाऱ्या दोन स्टाफ मेंबर्सना कोरोना झाला असल्याची बाब समोर आली आहे, त्यामुळे एकूणच या रोगामुळे आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणखीनच तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.


Kjo_1  H x W: 0


करण जौहर यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते सांगतात, त्यांच्या घरी काम करणाऱ्या दोन स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे त्यांना करण यांच्या इमारतीतील दोन खोल्यांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच करण जौहर यां सहत्यांची आई, त्यांची दोन्ही मुले आणि इतर हाउस स्टाफ यांची देखील टेस्ट करण्यात आली आहे, मात्र त्याचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. तरी देखील सावधगिरी बाळगण्यासाठी करण यांनी स्वत:ला त्यांच्या परिवारासह १४ दिवसांसाठी पूर्णपणे सेल्फ क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला असून, ते सरकार आणि यंत्रणेच्या संपर्कात आहेत. एकूणच कोरोनाने संपूर्ण देशभर थैमान घातला आहे. देशात आताच्या घडीला १ लाख ४५ हजार लोक कोरोना रुग्ण आहेत, तर तब्बल ४१६७ लोकांनी या महामारीमुळे आपला जीव गमावला आहे. एकट्या महाराष्ट्रातच कोरोनाचे ५० हजाराहून अधिक रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत, ज्यापैकी मुंबईमध्ये ३० हजारच्या वर रुग्ण आढळले आहेत. परिस्थिती एकूणच गंभीर आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी आणि सरकार तसेच यंत्रणेला सहकार्य करावे अशी विनंती अनेक सेलिब्रिटीज आणि केंद्र सरकारतर्फे करण्यात आली आहे.