वाढदिवशी सोनाली कुलकर्णीने दिली ही गोड बातमी..

    19-May-2020
|

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवशी एक आनंदाची बातमी दिली आहे. सोनाली कुलकर्णीने दोन महीन्यांआधी दुबईमध्ये साखरपुडा केला, त्याची घोषणा काल तिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. कुणाल बेनोडेकर यांच्यासोबत सोनालीने २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबई येथे साखरपुडा केला. त्याची माहिती तिने काल इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून दिली.


sonali_1  H x W


अतिशय सुरेख असे फोटोज तिने शेअर केले आहेत, आणि यामुळे तिच् चाहते आवाक झाले आहेत.
आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला, आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं... आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या...!!!” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आणि तिच्या चाहत्यांमध्ये एकच आनंदाची लहर पसरली.
या फोटोजमध्ये सोनाली साउथ इंडियन लुकमध्ये खूप छान दिसते आहे. कुणाल देखील शेरवानीमध्ये उठून दिसतोय. आपल्या वाढदिवसाला आणखी सुंदर करण्यासाठी तिने या खास दिवसाची वाट बघितली ही महत्वाची बातमी देण्यासाठी. आणि एकूणच तिच्या वाढदिवशी तिने तिच्या चाहत्यांना एक गिफ्ट दिले आहे.