महाराष्ट्र दिनानिमित्त ही गाणी अवश्य ऐका..

    01-May-2020
|


जय महाराष्ट्र 


आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन | आणि महाराष्ट्र दिन म्हटले कि आपल्या डोळ्यांसमोर अचानक येतात ती काही गाणी | प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा, किंवा सुंदर देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, जय जय महाराष्ट्र माझा आणि अशीच अनेक गाणी | तर आज महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत अशीच काही खास गाणी | लॉकडाऊनच्या काळात या गाण्यांची मजा अवश्य घ्या | आणि महाराष्ट्र देशाला मनापासून वंदन करा |


Maharashra_1  Hमहाराष्ट्र दिनानिमित्त काही खास गाणी म्हटली कि पहिलं गाणं येतं ते..


१. प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा : या गीताला महाराष्ट्र गान असे म्हटले आहे. ख्यातनाम कवि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी हे महाराष्ट्र गान लिहीले आहे. आणि याला संगीत दिले आहे शंकरराव व्यास यांनी.बहु असोत सुंदर संपन्न की महा ।


प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥२. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा : आधल्या गीताप्रमाणे हे गीत देखील सर्व महाराष्ट्रवासियांच्या मनाच्या खूप जवळचं गीत आहे. हे गीत ऐकलं की सर्वांचं मन अभिमानानं भरून येतं. हे गीत लिहीले आहे, राजा बढे यांनी, याला संगीतबद्ध केले आहे प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी तर हे गीत म्हटले आहे प्रसिद्ध शाहीर साबळे यांनी | चला तर मग ऐकूया.. जय जय महाराष्ट्र माझा.. गरजा महाराष्ट्र माझा.३. सुंदर देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा : असेच अतिशय सुंदर गीत आहे ‘महाराष्ट्र देशा’. महाराष्ट्राचं, इथल्या संस्कृतिचं वर्णन करणारं, महाराष्ट्राचं महात्म्य सांगणारं एक सुरेख, सुरेल गीत | याला मराराष्ट्र गौरव गीत असेही म्हटले जाते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे गौरवगीत लिहीले आहे गोविंदाग्रज यांनी.
या गाण्याची दोन वर्शन्स आली आहेत, एक जुनं आणि एक नवीन दोन्हीही ऐकण्यासारखी आहेत. नवीन गाणं मिथिला पालकर आणि गंधान यांनी गायलं आहे, भाडिपातर्फे ते प्रस्तुत करण्यात आले आहे. तरुण मंडळीला हे गाणं खूप आवडलं आहे, आणि यामुळे त्यांना हे तोंडपाठ देखील झाले आहे.
४. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी : मराठी भाषेचे गौरवगान म्हणजे हे गीत आहे | याला मराठी अभिमान गीत असे म्हटले आहे. कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला मराठीतील सर्व दिग्गज गायकांनी आवाज दिला आहे, तसेच मराठी सिनेसृष्टीतील सर्व कलाकार देखील आपल्याला या गाण्यात दिसतात. 


५. जय जय महाराष्ट्र माझा (अवधूत गुप्ते ) : हे जय जय महाराष्ट्र जरा वेगळं आहे. अवधूत गुप्ते यांच्या या गाण्याची खासियत म्हणजे जे मूळचे महाराष्ट्रातील नाहीत मात्र आता महाराष्ट्राचेच झाले आहेत, जे मराठी भाषिक नाहीत मात्र महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत, अशा सर्वांसाठी त्यांनी हे खास गीत संगीतबद्ध केले, लिहीले आणि गायले देखील आहे. आजही तरूणाई हे गाणं पूर्ण जोशात म्हणते.. 

" तो फिर खोल दिल बोल दिल के तलों से की जय जय जय जय..
महाराष्ट्र माझा.. गरजा महाराष्ट्र माझा.."ही सर्वच गाणी महाराष्ट्राचं गौरव गान करणारी आहेत. मराठी माणूस असण्याची आणि त्याचा अभिमान बाळगण्याची जाणीव करून देणारी आहेत. Fikarnot.online परिवारातर्फे सर्वांनाच महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! जय महाराष्ट्र !!!