रणवीर आणि दीपिका झाले मिकी आणि मिनी माऊस

    09-Apr-2020
|

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची जोडी जगप्रसिद्ध आहे | आता सध्या या क्वारंटाइनच्या काळात दोघेही एकमेकांचे किंवा आपापले वेगवेगळे फोटोज पोस्ट करत आहेत. त्यामध्ये नुकताच रँवीर ने पोस्ट केलेल्या फोटोजची चर्चा संपूर्ण इंटरनेटवर दिसून येत आहे.


Ranveer singh_1 &nbs


त्याचे झाले असे कि रणवीरने त्याचा आणि दीपिकाचा एक एनिमेटेड फोटो, ज्यात रणवीर मिकी आणि दीपिका मिनी माऊस दिसते आहे, इंस्टाग्रामवर पोस्ट केला. आणि गंमत म्हणजे ते दोघेही या फोटोत खूपच गोड दिसताएत. त्यामुळे फॅन्सने या फोटोवर अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.लॉकडाउनच्या या काळात दीपिका पाहुकोण वेगवेगळे पदार्थ बनवून रणवीरला खाऊ घालतेय, त्यामुळे तो हे लॉकडाउन संपल्यावर नक्कीच लठ्ठ होणार अशा अर्थाचा हा फोटो आहे. “दिल का रास्ता पेट से होकर जाता है” अशी या फोटोची कॅप्शन आहे. एकूण काय तर रणवीर आणि दीपिका हा लॉकडाउनचा काळ एंजॉय करताना दिसताएत.