‘बॉब द बिल्डर’ चा आवाज हरपला…

    06-Apr-2020
|

‘बॉब द बिल्डर कर के दिखाएँगे, बॉब द बिल्डर हाँ भाई हाँ..’ हे आठवतं? हे गाणं ऐकलं कि पावलं आपोआप टीव्हीच्या दिशेने वळायचे. या बॉबचा आवाज अजूनही कानात घुमतो. मात्र आता हा आवाज आपल्याला पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाहीये. या कार्टूनमध्ये बॉब ला आवाज देणारे विलियम डफ्रिस यांचे निधन झाले आहे. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाने आजारी होते, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

bob the builder_1 &n


बॉब द बिल्डर आणि त्याचे वेगवेगळे मशीन्स हे आजही डोळ्यांसमोर उभे आहेत. त्याचे वेगवेगळे ट्रक्स, डेझी, आणि त्याचा टूलबॉक्स हे सर्व मिळून अनेक कामं करायची. या कार्टूनमधील सगळ्यात खास बाब म्हणजे याचं गाणं लहान मुलांचं लाडकं होतं. हे गाणं लागलं रे लागलं कि सर्व लहान मुलं टीव्ही समोर येऊन बसायचे.


वयाच्या ६२व्या वर्षी डफ्री यांनी शेवटचा श्वास घेतला. पॉकेट युनिवर्स प्रोडक्शन ने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. बॉब द बिल्डरच्या चाहत्यांना ही बातमी ऐकून नक्कीच वाईट वाटले असणार.