कोरोनाशी लढण्यासाठी चिरंजीवी, नागार्जुनाचा खास व्हिडियो व्हायरल

    03-Apr-2020
|

चिरंजीवी आणि नागार्जुना ही नावं दक्षिण भारतात देवा सारखी पुजली जातात. मात्र केवळ दक्षिण भारतच नाही, तर संपूर्ण देशात त्यांचे खूप चाहते आहेत. आणि म्हणूनच या चाहत्यांपर्यंत कोरोना संदर्भात जागरुकता पसरावी, त्यांना या परिस्थितीषशी दोन हात करण्याचे बळ मिळावे यासाठी चिरंजीवी आणि नागार्जुना या दोघांनी अनेक इतर कलाकारांसह एक गाण्याता व्हिडियो प्रदर्शित केला आहे. गाणं दाक्षिणात्य भाषेत असलं तरी देखील त्यांचे हावभाव तसेच त्यांचे म्हणणे हे प्रत्येकापर्यंत पोहोचेल यात वाद नाही.


Chiranjivi_1  H


ऑल इंडिया रेडियो वरुन हा व्हिडियो शेअर करण्यात आला आहे. आणि हा व्हिडियो पोस्ट केल्यावर काही वेळातच खूप व्हायरल झाला आहे. यामध्ये कोरोना संदर्भात घेण्यात येणारी काळजी, आणि एक्तर मिळून आपण या परिस्थिची सामना कसे करु शकतो हे सांगण्यात आले आहे.असं म्हणतात संगीत हे मेडिटेशनचं काम करतं. ऐकूणच आताच्या परिस्थितीत संगीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत जो संदेश पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे, तो या व्हिडियो मधून देण्यात आलेला आहे. नक्की बघा हा खास व्हिडियो.