कोरोना ठरले पर्यावरणासाठी वरदान ?

    29-Apr-2020
|


-नेहा भोळे (जावळे)
आज जागतिक पातळीवर एकच विषय सुरु आहे आणि तो म्हणजे कोरोना. या विषाणूने मानव जातीला रोजच्या धावपळीच्या तकतकीतून जरा श्वास घेण्यास वेळ दिला. माणूस कधीच न थांबणार रसायन आहे. 'जो थांबला तो संपला’ असं आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात आलं आहे. मग माणूस येथे मागे कसा पडणार? मात्र या कोरोना विषाणूने आपल्या पृथ्वीला नवे जीवन देण्याचा अट्टहास धरला आहे असे आता वाटू लागले आहे.

 

Environment_1  

यूएनचे पर्यावरण प्रमुख इनगर अँडरसन यांच्या मते, निसर्ग कोरोना विषाणूच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या हवामानातील बदल या संकटाचा इशारा देत आहे आणि हा इशारा मानवाने गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. पुढे अँडरसन म्हणतात की मानवतेने हानिकारक परिणामांसह नैसर्गिक जगावर बरेच दबाव आणले आहेत. आपल्या ग्रहाची (पृथ्वीची) काळजी न घेणे म्हणजेच स्वतःची काळजी घेण्यास अयशस्वी ठरणे असे आहे. कोरोना विषाणू हा मानवाला स्पष्ट चिथावणी देत आहे आणि निसर्ग आपल्याला वारंवार समजविण्याचा प्रयत्न करत आहे मात्र आपण अजून देखील सतर्क होत नाही.

आघाडीच्या शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की कोविड -19 हा उद्रेक असून मानवजात आज आगीशी खेळत आहे. मनुष्याच्या निष्काळजी वागणूकीमुळे हा रोग मनुष्यात पसरला आहे आणि यातून आता बाहेर येणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अमेरिकेतील न्युयार्क शहर हे स्वप्नांच शहर मानलं जातं मात्र सध्या या शहराची अवस्था प्रेतांचे शहर अशी झाली आहे. कोरोना विषाणूमुळे जेवढा धोका मानवाला आहे त्याहून मोठा धोका भविष्यातील अर्थव्यवस्थेला होणार आहे असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.


Environment_1  


वरील बाबी सगळ्या खऱ्या असल्या तरी देखील कोरोना आणि पर्यावरण हा विषय समजावून घेणे गरजेचे आहे. जगापुढे आता अर्थव्यवस्था, जैवविविधता, कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक अशा समस्या थाट मांडून बसल्या आहेत. जनावरांच्या कत्तली आणि वन्यजीवांच्या क्षेत्रात केलेल्या घुसखोरीमुळे पर्यावरणाला मोठा धोका आपण पोहोचविला आहे. त्यामुळे वन्यजीव देखील आपल्याला आजकाल सर्रास शहरात पाहायला मिळतात.

 


या आधीही अनेक रोगांनी मानवी जीवन विस्कळित केले होते. प्लेग, इन्फ्ल्युएन्झा, कांजण्या, चिकनगुनिया, टायफाईड, डांग्या खोकला, डेंग्यू या साथीच्या रोगांची लागण 19 व्या शतकापासून सुरू झाली होती. मात्र या रोगांना मानवाने आटोक्यात आणले आणि आज हे रोग नामशेष झाले. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर वाढते प्रदुषण, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट, वातावरणातील वाढते मिथेनचे उत्सर्जन, ऑक्सिजनचा अभाव, कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण यामुळे आपण पृथ्वीचे आयुष्य कमी केलेच आहे सोबतच मानवाची रोगप्रतीकारक शक्ती देखील कमी केली आहे.प्रत्येक वर्षी, ग्लोबल वार्मिंगच्या परिणामाबद्दल वैज्ञानिक अधिक जाणून घेतात. या परिणामांचा अभ्यास करून वैज्ञानिक अनेक वेळा जगाला सतर्क करण्याचा प्रयत्न करित असतात. बरेच लोक वैज्ञानिकांच्या या निष्कर्षाला सहमत देखील आहेत. जर सध्याचा ट्रेंड कायम राहिला तर पर्यावरणीय घडामोडींचा विपरीत परिणाम आर्थिक आणि आरोग्यावर होणार हे विधिलिखीत आहे. याच सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर आपल्याला एक अंदाज असा बांधता येईल की, कोरोना विषाणू हा निसर्गाचा एक सतर्कतेचा इशारा असू शकतो काय?


आज जगभरात लॉकडाऊन हि संकल्पना सुरू आहे. लोकांना आता घरात कंटाळा येत असला तरी मात्र आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला असता हा काळ केवळ पर्यावरणाला देणे गरजेचे आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आज तारखेपर्यंतच्या वातावरणातील बदलाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, भारतातील अनेक मेट्रो शहरातील प्रदूषण कमी झाले आहे. नवी दिल्ली, अहमदाबाद, पुणे, चेन्नई, हैद्राबाद, कलकत्ता, या मेट्रो शहरांची हवेची गुणवत्ता सुधारली असून प्रदूषण पातळी घसरली असल्याचे टिपण्यात आले आहे.


Environment_1  


वायू प्रदूषण : कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचा मुख्य परिणाम म्हणजे वायू प्रदूषणातील महत्त्वपूर्ण घसरण, जी जगाच्या बर्‍याच भागात नोंदविली गेली आहे. चीनच्या हुबेई प्रांतात नासाने पहिल्यांदा

 

वायू प्रदूषणामध्ये घसरण नोंदविली होती. येथे कोरोना व्हायरसचा उद्रेक डिसेंबर 2019 मध्ये सुरू झाला त्यानुसार स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे संशोधक मार्शल बुर्के यांनी चीनमध्ये नोंदलेल्या हवेच्या गुणवत्तेत झालेल्या सुधारणांची गणना केली तर 4,000 मुलांचे प्राण यातून वाचवले जावू शकते असा निष्कर्ष पुढे आला होता. ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी होत असल्याने हवेची गुणवत्ता लक्षणीय सुधारली आहे आणि यामुळे पृथ्वीचा ओझोन थरही पुन्हा सावरत आहे.Environment_1  


ग्रीन गॅस उत्सर्जनः देशातील शाळा, कारखाने, उद्योगांचे बंद पडण्याचे आदेश आणि ग्रीन गॅस उत्सर्जन कमी होत असल्याने हळूहळू हवेचा स्तर सुधारत जात आहे. कार्बन डायबॉक्साईडचे उत्सर्जन देखील कमी होत आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या चीनमध्ये कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन सुमारे 25 टक्क्यांनी कमी झाले आहे

 


इटलीच्या व्हेनिसचे पाणी पुन्हा स्वच्छ झालेः कोरोना व्हायरसचा वातावरणावरील आणखी एक अनपेक्षित परिणाम इटलीच्या व्हेनिसमध्ये दिसून आला आहे. येथे विषाणूमुळे पर्यटकांची संख्या बरीच कमी झाली आहे, त्यामुळे व्हेनिसच्या कालव्यांमधील पाणी स्वच्छ झाले असून कालव्यांमध्ये मासे पुन्हा दिसू शकतात असा अंदाज आहे.


EnvironmenItlyt_1 &n


न्यूयॉर्कः बहुतेक देश आणि शहरे आता बंद आहेत. चीन बाहेरील काही प्रमुख शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारतांना दिसत आहेत. एक उदाहरण म्हणजे न्यूयॉर्क शहर, न्यूयॉर्कमध्ये कार्बन डाय ऑक्साईड सारख्या वायू प्रदूषकांमध्ये १०% घसरण झाल्याचे संशोधकांना आढळले आहे. मिथेन उत्सर्जनातही लक्षणीय घट झाली आहे. उत्तर इटलीमध्येही तसाच परिणाम दिसून आला आहे.

 EnvironmenItlyt_1 &n

वरील काही चांगले परिणाम कोरोना विषाणूमुळे आज आपल्याला दिसत आहेत. आता या विषाणूच्या चांगल्या बाजूंचा अभ्यास केला असता केवळ पर्यावरणावर याचा सकारात्मक परिणाम होतांना आपल्याला दिसत आहे. मात्र याच कोरोना विषाणूचा जगावर होणारा नकारात्मक परिणाम आपण अभ्यासला तर या विषाणूमुळे मानव कित्येक वर्ष मागे जावू शकतो. त्यामुळे हा विषाणू लवकरात लवकर या जगातून नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.