दिल्लीतील विद्यार्थ्यांकडून घरभाडं घेणाऱ्या घरमालकांविरुद्ध होणार कारवाई

    24-Apr-2020
|

दिल्ली येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना लॉकडाउनच्या काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. खाण्यापिण्याचे हाल होताएत, राहण्याचे हात होताएत, मात्र अनेक घरमालक या काळात देखील विद्यार्थ्यांकडून घरभाडं घेत आहेत, आणि जे विद्यार्थी त्यांना घरभाडं देत नाही, त्यांना काढून टाकण्यात येत असण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र यावर अंकुश लावण्यासाठी दिल्ली सरकार अशा घरमालकांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे दिल्ली येथील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


Delhi_1  H x W:


दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांनी नुकतेच सांगितले कि दिल्ली येथे राहणाऱ्या विद्यार्थी आणि मजुरांना घरमालक त्रास देत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात अनेकांना घरभाडं वेळेवर भरण्यास अनेक समस्यांचा सामना करवा लागतोय, त्यामुळे घरमालक त्यांना त्रास देत असलाचे दिसून आले आहे. आणि म्हणूनच अशा घरमालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


जिल्हा दंडाधिकारी या विषयावर जनजागृती मोहीम हाती घेतील, विशेषत: कामगार आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त असलेल्या भागांमध्ये लोकांनी जागरुक रहावे, अशी घटना घडल्यात १०० या क्रमांकावर पोलिसांना कळवावे, असेही ते म्हणाले आहेत.


Delhi_1  H x W:


या आधी दिल्ली सरकारने आदेश दिला होता कि, “घरमालकांनी पुढील १ महीन्याचे भाडे, भाडेकरुंना मागू नये. तसेच कुठल्याही घरमालकाने विद्यार्थी किंवा या मजुरांना घर रिकामे करण्यात सांगितले तर त्यांच्यावरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. सरकारच्या या आदेशाविरुद्ध देखील अनेक घरमालक अद्यापही भाडेकरुंना त्रास देत असल्याचे समोर आले, आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला.


या बातमीमुळे दिल्लीतील विद्यार्थ्यांना आणि मजुरांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. कुठलाही घरमालक या कठीण काळात त्यांना घराबाहेर काढू शकत नाही, तसेच त्यांना त्रास देऊ शकत नाही. आणि तसे झाल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.