सचिन पिळगावकरांची कन्येसोबतची जुगलबंदी बघितली का?

    21-Apr-2020
|

सचिन पिळगावकर, म्हणजेच आपले महागुरु, बरेच दिवस झाले टीव्हीवर दिसले नाहीत, मात्र ते नुकतेच इंस्टाग्राम वर आले आहेत. आणि आता त्यांचा गाण्याचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. हा व्हिडियो आहे त्यांच्या मुलीसोबत त्यांनी गायलेल्या एका गाण्याचा. आणि त्याचं खास कारण म्हणजे त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर हा व्हिडियो टाकत एक खूपच गोड अशी कॅप्शन लिहीली आहे.


Sachin Shriya_1 &nbs


सचिन आणि श्रिया पिळगावकर चलती का नाम गाडी या चित्रपटातील प्रसिद्ध गीत जे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलं आहे, ‘हाल कैसा है जनाब का’ एकत्र गात असतानाचा हा व्हिडियो आहे. त्यांची ही जुगलबंदी म्हणजे एक ‘म्यूजिकल ट्रीट’ आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दोघांनेही अतिशय गोड आवाजात हे गीत म्हटलं आहे.
या व्हिडियो खालची कॅप्शन या दोघांच्या आवाजाहूनही गोड आहे. श्रिया लिहीते, “ मी हे गाणं बाबांसोबत मी खूप लहान असताना म्हणायचे. काहीच बदललं नाहीये, मी अजूनही त्यांचं बाळ आहे, आणि आम्हा दोघांना अजूनही हे गाणं खूप आवडतं.” आहे ना ही कॅप्शन खूपच गोड.


श्रिया पिळगावकर मिर्झापुर या वेब सीरीज मध्ये केलेल्या कामामुळे हिंदी सिनेसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे. या शिवाय तिने एकुलती एक, हाउस अरेस्ट अशा काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. आपल्या वडीलांसारखीच ती देखील तिच्या विविधगुण कौशल्यासाठी प्रसिद्ध आहे.