विषय गंभीर पण सरकार खंबीर का?

    21-Apr-2020
|

                                                                                                                        - सिद्धी सोमाणी

माणूस म्हणून.. अगदी कुठल्याही बाजूला न झुकलेला साधा माणूस म्हणून या सगळ्या घटनेचा विचार करावासा वाटतो. आपल्या जीवांना किंमत नाही हे माणसानेच आज दाखवून दिले. दिवसभर नक्की काय झाले, कोणी राजकारण करतंय का, सोशल मीडियावर काय चाललंय हे बघत शेवटी विषय हाताळायला घेतलाच.
Sadhu_1  H x W:

 

साहजिकच पहिला प्रश्न मलाही पडला की लॉकडाऊन असताना हे साधू निघाले तरी कुठे होते? उत्तर एका पत्रात सापडलं.. हो, हो अधिप्रमाणित पत्रातच सापडलं. ‘श्री पंच दशनाम जूना आखाडा’ ने महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की संत कल्पवृक्ष गिरी, ७० आणि संत सुशील गिरी, ३५ हे गुरुंची अचानक मृत्यू झाल्याने मुंबईहून गुजरातला अंत्यविधीस निघाले. लॉकडाऊन असल्याने हायवेने जाणाऱ्या या दोन संतांना आणि सोबत असलेल्या निलेश तेलगडे नावाच्या ड्रायव्हरला पोलिसांनी अडवले आणि परतीची वाट धरण्यास सांगितले.


पालघर जवळील गढचिंचले गावातून प्रवास करत असताना तिथे जवळपास २०० लोकांनी संतांची गाडी उलट करत दगडं फेकायला सुरू केली. एका वन विभाग कर्मचाऱ्यांने पोलिसांना कळवले आणि नंतरचा व्हिडिओ तर सोशल मीडियावर व्हायरल झालाच आहे. पोलिसांच्या देखत या संतांचा आणि ड्रायव्हरचा जीव घेण्यात आला.

पुढचा प्रश्न पडला तो म्हणजे हे २०० लोक लॉकडाऊन असताना जमा झालेच कसे? खरंतर सरकारने पहिला गुन्हा यांच्यावर हाच दाखल केला पाहिजे, नाही? सामान्य लोक भाजी घ्यायला गेलेले यांना चालत नाही, लगेच फटके मारायला सुरुवात होते.. एकत्र २०० लोक जमा झालेच कसे? असो, तर आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे ही मारहाण गैरसमजपोटी झालेली दिसते. हे साधू चोर की काय असे समजून या जमावाने नको त्या प्रमाणे कायदा हातात घेतला आणि तिघांना शेवटचा श्वास घेण्यास भाग पाडले.


Sadhu_1  H x W:

 


आता हे मारणारे लोक कोणाच्या सांगण्यावरून गोळा झाले, आपलेआपणच गोळा झाले की मुसलमान लोकांनी, कॉम्युनिस्ट लोकांनी गोळा केलेत, हे असले तर्क लावण्याइतपात मी काही हुशार नाही! पण तरी १६ तारखेला घडलेल्या या दुर्दैवी प्रकरणाबाबत मीडियाला, सरकारला, ‘ते साधू चोर होते’ अशी खोटी माहिती का देण्यात आली असावी, याचेच काय ते आश्चर्य!

 


खरंतर का मारले हे कारण समजता हसावे की रडावे हेच समजत नाहीए! हे साधू, साधू नसून खरंच चोर असते तरीही त्याना जीवे मारणं कितपत योग्य आहे हो? त्या प्रियांका रेड्डीच्या गुन्हेगारांना पोलिसांनी गोळ्या घातल्या तेव्हा मानवी हक्काच्या बाता करणारे लोक आज या निरपराध साधूंच्या हत्ये प्रकरणात का गप्प आहेत, या विचाराने थोड गोंधळायला होतय. पालघरमध्ये आज २० हून अधिक परिसर हे कोरोना हॉटस्पॉट संबोधले गेले आहेत आणि सिलही आहेत. अशातच पोलिसांनी, गावातील (गढचिंचले) पंचायतीने जमवला परवानगी दिलीच कशी असेल? मुळात दिली असेल का? सरकारी कामं कशी पार पडतात आपल्याला इथे हे काही वेगळं सांगायला नको!

पोलिसांचा हात आहे असं मी सरळ सरळ म्हणत नाही. पण दृष्टी आड सृष्टी करावी तरी कशी? साधूने पोलिस अधिकारीचा मदतीसाठी हात धरत असल्याचा आणि पोलिस काहीही ना करत असल्याचा व्हिडीओ तर व्हायरल झालाच आहे. चौकशी या घटनेची तर होईल, निश्चितच! पण २०० पैकी ११० लोकांना अटक करून, पंचायत अधिकारींना निलंबित करून, घटना घडल्याचा ४थ्या दिवशी केस सी आय डी कडे देऊन हा प्रकार इतक्यात कही सुटेल असे दिसत नाही.

मुख्यमंत्री कोरोना काळात थोडं बरं काम करताहेत असे कुठे वाटायला सुरुवात झाली असतानाच हा सगळा प्रकार घडायचा होता. आता पुढे काय नवीन हे काही माहीत नाही. तरी लाज वाटावी आशा घडलेल्या पालघर प्रकरणात नक्की झाले काय हे समजून उमजून हिंदू-मुस्लिम-कम्युनिस्ट वादाचा विचार करत, नसते तर्क वितर्क लावत राहूया!

Credits : 'Blog post @eviewhost.com'- सिद्धी सोमाणी