महाराष्ट्र कोरोना व्हायरस महामारीचे केंद्रबिंदु बनले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि एकूणच संपूर्ण देश सध्या लॉकडाऊन आहे. आणि ज्यामुळे जनजीवन स्थिरावले आहे.
राज्यात कोरोना संक्रमित लोकांचा आकडा १००च्या वर गेला आहे, आणि यामुळे रुग्णालयांना त्यांचे काम अबाधित सुरु ठेवण्यात अडचण येत आहे. मंगळवारी झालेल्या पावसामुळे अनेक रुग्णालयांना वीज कपातीचा तडाखा देखील बसला. त्यांना पावर बॅकअपसाठी डीझेलची आवश्यकता होती. त्यांच्या मदतीसाठी रीपोस एनर्जी धावून आले.
“रुग्णालयांमध्ये दररोज साधारण ५०० ते २००० लीटर डीझेलची आवश्यकता असते, त्यांच्या डीझेलच्या उपभोगावर ही गरज ठरत असते. आम्ही पुण्याच्या अनेक महत्वाच्या रुग्णालयांपर्यंत पोहोचत आहोत. यामध्ये सह्याद्री, जहाँगीर आणि आदित्य बिरला रुग्णालयांचा देखील समावेश आहे.” अशी माहिती रीपोसच्या सह संस्थापिका अदिती भोसले वाळुंज यांनी दिली.
“रुग्णालयांमध्ये नेहमीच बॅकअपची आवश्यकता असते. खासकरून व्हेंटीलेटर आणि आयसीयू मधील मशीन्सचा वापर अबाधित रहावा यासाठी ही गरज नक्कीच असते.” अशी माहिती अदिती यांनी दिली.
“सध्याच्या घटकेला रीपोसचे २ पेट्रोल पंप्स कार्यरत आहेत. जे साधारण २२ मोठ्या आणि काही लहान रुग्णालयांमध्ये सतत सेवा पोहोचवितात आहेत.” असेही त्यांनी सांगितले.
एकूण ४ कर्मचारी आळीपाळीने डीझेल पोहोचविण्याचे काम करत आहेत. “वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेले सर्व नियम आमचे कर्मचारी काटेकोरपणे पाळताएत, ते सॅनिटायझर्सचा वारंवार वापर करताएत तसेच सुरक्षा वस्त्र देखील घालताएत, मास्क घालताएत याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.” अशी माहिती रीपोसचे संस्थापक चेतन वाळुंज यांनी दिली.
“पुढील २० दिवसांपर्यंत व्यवस्थित पुरेल इतके डीझेल आहे. काही गृहसंस्था आणि कचरा व्यवस्थापन डेपोंना देखील आम्ही डीझेल पुरवत आहोत. जेणेकरुन त्यांचे काम बाधित होणार नाही.” असेही ते म्हणाले.