नवी मुंबई जवळील ‘पिंक बॅकवॉटर्स’ ने वेधले सगळ्यांचे लक्ष..

16 Apr 2020 14:55:23
लॉकडाउन झाल्यापासून सगळीकडेच एकूण प्रकृति प्रसन्न झाल्याचे दिसून येत आहे. मग ते हवा शुद्ध होणं असू देत, प्राण्यांचा, पक्ष्यांचा मुक्त संचार असू देत किंवा अगदी बहरलेली झाडं असू देत, प्रकृति पासून मनुष्य लांब गेल्याने प्रकृतिला मात्र आता मोकळा श्वास घेता येत आहे. आणि असेच एक दृश्य नवी मुंबई जवळच्या एका तळ्यात दिसून आले. या ‘पिंक बॅकवॉटर्स’ ने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नवी मुंबई जवळील एका तळ्यात अचानक मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी आले आहेत. आणि एकूणच यामुळे संपूर्ण परिदृश्य हे गुलाबी झाले आहे. त्यामुळे ट्विटर वर सध्या या बाबत चर्चा रंगली आहे.


flamingo_1  H x


नेरुळच्या सीवुड्स कॉम्प्लेक्स मधून हरिंदर सिक्का यांनी या फ्लेमिंगोजचा सुरेख व्हिडियो ट्विटर वर पोस्ट केला आहे. ते लिहीतात, “दरवर्षी हे किमान शंभर फ्लेमिंगोज तरी येतात, मात्र या वर्षी ही संख्या १००० च्या पलिकडे आहे. फ्लेिमिंगोजना कसं बरं कळलं असेल या बदलाबद्दल?” व्हिडियो मध्ये मोठ्या संख्येत फ्लेमिंगोज उडून येताना दिसून येत आहेत.



दरवर्षी भारतात अनेक पक्षी विस्थापित होऊन येतात, आणि मौसम बदलला वातावरण बदललं कि ते पुन्हा आपल्या देशी निघून जातात, पुण्याजवळील भिगवण येथे तर हे फ्लेमिंगोज हमखास बघायला मिळतात, मात्र नवी मुंबईत हे दृश्य दिसणं म्हणजे एक पर्वणीच आहे. मुंबईकरांना माणसांची वर्दळ थांबल्यामुळे हे अतिशय सुरेख दृश्य बघायला मिळतंय.


Powered By Sangraha 9.0