फेसबुक फोटोज वर पडला कवितांचा पाऊस, मार्क झुकरबर्गला ही सोडले नाही

    01-Apr-2020
|

परवा पासून आपल्या अनेकांच्या फेसबुक टाइमलाइनवर अनेकांचे जुने फोटोज ओळीने दिसत असतील. त्यावर अतिशय खरतरनाक अशा कविता स्वरूपातील कमेंट्स देखील दिसत असतील. मात्र तुम्ही एकटेच नाही आहात, तर हा ट्रेंडच सुरु झाला आहे. एकूणच क्वारंटािन मुळे आणि लॉकडाउन झाल्यामुळे अनेकांनी ही गंमत सुरु केली, मात्र एकाएकी सगळ्यांच्या फेसबुक प्रोफाइल्स खतरनाक कमेंट्स ने आणि नोटिफिकेशन्सने भरून गेल्या. सगळ्यात गंमतीची बाब म्हणजे लोकांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गलाही सोडले नाही. अनेक मराठमोळ्या लोकांनी मार्क झुकरबर्गच्या प्रोफाइल फोटोवर अतिशय मजेशीर अशा मराठी चारोळ्या कमेंट्स स्वरूपात पोस्ट केल्या आहेत.

facebook_1  H x


झुकरबर्ग यांच्या प्रोफाइल फोटोवर त्यांनी १५ आठवड्यांआधी एक कमेंट केली होती, त्याखाली एकाएकीच मराठी कमेंट्सचा पाउस पडायला लागला, एकूणच मार्क झुकरबर्गच्याही लक्षात आले नसणार कि हे काय चालू झाले आहे. त्यांच्या प्रोफाइल फोटोवर ‘बदकाची मान वाकडी, भाऊ आपला कोवळी काकडी’ अशी कमेंट केली आहे, तर एकाने ‘पैशाचा जुडीला म्हणतात बंडल, भाऊंवर फिदा झाली रानू मंडल’ अशी कमेंट केली आहे. एकूणच वाचायला मजेशीर अशा या कमेंट्स आहेत.


facebook_1  H xसध्या फेसबुकवर चालू असलेल्या या ट्रेंड मधील काही प्रमुख कमेंट्स या अशा आहेत :


दूध पाहिजे लोकाले आपल्याले पाहिजे साय

 

दूध पाहिजे लोकाले आपल्याले पाहिजे साय

भाऊ ला पाहून वैनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय🙋 🤣🤣🤣


अख्या जगात पसरला करोना,

Pune च्या पोरी भाऊ ला म्हणतात,

मांग मेरी भरोना ❤️😂😂


तूफान 🌪🌪हो ..या आंधी...💨

पोरी पन म्हणायला लागल्या हाच माझा राहूल गांधी 😍😂😂🤣


भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी.......गॉगल लावून दिसतोय इमरान हाशमी 😎😎


अनेकांना हा थिल्लरपणाही वाटेल, मात्र हा ट्रेंड जगभरात फेमस झाला आहे, यात काही वादच नाही.