अमिताभ बच्चन यांचं ‘फास्ट पेंटिंग’ होतंय व्हायरल

    09-Mar-2020
|

Amit ji_1  H x

अमिताभ बच्चन यांचं फॅनफॉलोइंग मोजता येणार नाही इतकं मोठं आहे. त्यांचे चाहते त्यांच्यासाठी नेहमीच अनोखं काहीतरी करत असतात. मात्र दरवेळी ते त्यांच्या पर्यंत पोहोचतंच असं नाही. काही दिवसांपूर्वी एका कलाकाराने दोन्ही हातांने अमिताभ बच्चन यांचं ‘फास्ट पेंटिंग’ साकारलं. आणि मुख्य म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून ते अमिताभ यांच्यापर्यंत पोहोचलं देखील. ‘अदभुत’ असं म्हणत त्यांनी ट्विटरवर त्या कलाकाराचा चित्र काढतानाचा व्हिडियो शेअर केला आहे. अमित वर्मा असे या कलाकाराचे नाव आहे. ज्याने ही कला साकारली आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटर वरुन त्यांचे आभार देखील मानले आहे. व्हिडियोच्या सुरुवातीला पटकन लक्षात येत नाही हे कशाचं चित्र आहे ते, मात्र शेवटी आपले डोळे विस्फारतात इतकं अद्भुत असं हे चित्र या कलाकाराने काढले आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर आतापर्यंत हजारो चित्र काढण्यात आली असतील, त्यांना भेट म्हणून त्यांच्या अनेक पेंटिंग्स मिळाल्या असतील, मात्र असा एखादाच कलाकार असतो ज्याची कला थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्याचे कौतुक देखील होते. अमित वर्मा यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.