मी वसंतराव… ट्रेंडिंग टीझर

    06-Mar-2020
|

वसंतराव देशपांडे हे संगीत क्षेत्रातील अजरामर नाव. त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार आणि त्यात मुख्य भूमिका राहुल देशपांडे करणार यासारखी परवणी असेल ती काय. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ या चित्रपटाचे टीझर नुकतेच प्रदर्शित झाले आहे, आणि ते ट्रेंड करत असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये याचे ट्रेलर आणि या चित्रपटाविषयी मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे.

 

mi vasantrao_1  


“माझं घराणं देशपांडे, माझ्यापासूनच सुरु होतं…” असं म्हणणारे वसंतराव बघताना रसिक प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेला आदर अजून वाढतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीत युवा दिग्दर्शक मंडळीचे प्रतिनिधित्व करत निपुण दिग्दर्शित हा चित्रपट अतिशय मनोरंजक, सुरेख असेल असं या टीझर वरुन तरी वाटतं. या चित्रपटात एक महत्वाची भूमिका अमेय वाघ याने देखील साकारली आहे. तो लिहीतो वसंतरावांच्या जीवनावर सिनेमा होतोय तर मला त्याचा भाग व्हायचंय हा माझा हट्ट होता! माझा हा हट्ट निपुण धर्माधिकारी आणि राहुल देशपांडे यांनी प्रेमाने पूर्ण केला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, मी कुठली भूमिका साकारली आहे हे गेस करा. 


mi vasantrao_1  


mi vasantrao_1  


या चित्रपटात ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनीता दाते यांनी देखील एक महत्वाची भूमिका साकारली आहे. एकूणच चित्रपटाविषयी मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.