मोदी ने बोला फिट रेहने का तो रेहने का..

    30-Mar-2020
|

देशात कोरोनाची साथ आली असताना जेव्हा सर्वच आपापल्या घरी लॉकडाउन आहेत, अशा परिस्थितीत आपल्या फिटनेसची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या मन की बात मध्ये देखील याबद्दल भाष्य केले होते, त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नानंतर आज त्यांनी आपला योगासनं करतानाचा एक एनिमेटेड व्हिडियो सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे, तेव्हा पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पासून प्रेरणा घेऊन अनेक लोक आपापले फिटनेसचे व्हिडियोज पोस्ट करत आहेत.

PM Yoga_1  H x


 ते लिहीतात, “ कालच्या मन की बात मध्ये मला विचारण्यात आलेल्या प्रश्नानुसार आज मी माझ्या योगाचा व्हिडियो पोस्ट करत आहे, आशा आहे तुम्ही देखील फिटनेस साठी प्रयत्न करत असाल.” त्यांचा हा व्हिडियो एनिमेटेड असल्यामुळे लोकांचे या व्हिडियोकडे आकर्षण वाढले आहे.हा नवीन व्हिडियो नसून २ एप्रिल २०१८ रोजी यूट्यूब वर पोस्ट करण्यात आला होता, याला सुमारे १ लाख व्ह्यूज आहेत. पंतप्रधानांनी हा व्हिडियो पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया वर शेअर केला आहे. ते म्हणतात, “ मी फिटनेस किंवा मेडिकल एक्सपर्ट नाही, मात्र अनेक वर्षांपासून मी योगाभ्यास करतोय, आणि मला याचा फायदा झाला आहे. मला विश्वास आहे कि तुम्ही देखील फिटनेससाठी अनेक उपाय करत असाल, तसे असल्याल तुम्ही देखील अनेकांसोबत हे उपाय शेअर करा.”


तर मग मोदी ने बोला फिट रहने का तो रहने का…