आणि फरहा ताई वर्कआउटचे व्हिडियोज पोस्ट करणाऱ्या सेलिब्रिटीजवर चिडल्या

    27-Mar-2020
|

या क्वारंटाइनच्या काळात अनेक सेलिब्रिटीज अनेक प्रकारचे व्हिडियोज पोस्ट करताना दिसताएत | यामध्ये सगळ्यात जास्त व्हिडियोज जर कशाचे दिसत असतील तर ते म्हणजे ‘वर्कआउट व्हिडियोज’. घरी राहून सुद्धा आपण किती फिट राहू शकतो हे दाखवण्यासाठी सगळेच सेलिब्रिटीज आपले व्हिडियोज पोस्ट करत आहेत. मात्र या व्हिडियोजवर प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फरहा खान मात्र खूप चिडली.


farah Khan_1  H  

फरहा ने गमतीत आपला व्हिडियो पोस्ट करत सेलिब्रिटीजना वर्कआउट व्हिडियोज पोस्ट करु नका असं सांगितले आहे. एकूणच क्वारंटाईन झाल्यामुळे सगळे आपले फिटनेस व्हिडियोज पोस्ट करत आहेत, मात्र बास झालं आता, आता अजून असे व्हिडियोज पोस्ट करू नका आम्ही थकलो, असे म्हणत तिने हा व्हिडियो पोस्ट केला आहे.कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग लॉकडाउन झालं आहे. घरी बसून काय करावं असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. त्यामुळे फरहाचा हा व्हिडियो कठिण काळात देखील अनेकांना हसवून गेला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.