कोरोना पासून सावध राहण्यासाठी सेलेब्रिटीज करतायेत जनतेला आवाहन

    20-Mar-2020
|

कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे २१९ रुग्ण आढळले असून अनेकांची कसून तपासणी सुरु आहे, आता पर्यंत भारतात एकूण ४ लोक या विषमाणुमुळे मृत्युमुखी पडले आहेत. या परिस्थइती काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांसोबत अनेक सेलिब्रिटीज देखील पुढे येत जतनेमध्ये जागरुकता पसरविण्याचे काम करत आहेत.

corona_1  H x W

अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षित नेने, अनिल कपूर, अक्षय कुमार, वरुण धवन, आयुष्मान खुराना, रणवीर सिंह, अजय देवगण, शिल्पा शेट्टी कुंद्रा, अर्जुन कपूर, आलिया भट्ट अशा अनेक सेलिब्रिटीज ने एकत्र येऊन एक व्हिडियो केला आहे, ज्यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरस पासून सावध राहण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. #WaragainstCorona या हॅशटॅग खाली त्यांनी हा व्हिडियो पोस्ट केला आहे.याच प्रमाणे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी देखील एक व्हिडियो पोस्ट करत जनतेला सावध राहण्याचा इशारा केला आहे. या व्हिडियोत त्यांनी ‘सोशल डिस्टंसिंग’ पाळण्याबद्दल सांगितले आहे. त्याच प्रमाणे कार्तिक आर्यनने आपल्या ‘प्यार का पंचनामा’ स्टाईलमध्ये लोकांना झापलं आहे, तसेच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.मराठी सेलेब्रिटीजमध्ये सुमीत राघवन यांनी जनतेला ‘पचापच थुंकू नका’ असे अतिशय महत्वाचे आवहान करत इतर काळजी घेण्याची विनंती केली आहे, तर आनंद इंगळे यांनी देखील लोगकांना आपापल्या घरीच राहण्याचे आवाहन केले आहे.