जगभरात होतंय भारताचं कौतुक, पंतप्रधान नरेंद्री मोदींनी जाहीर केला ‘ कोरोना आपात्कालीन फंड’

16 Mar 2020 14:00:36
जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. असे असताना भारताने या परिस्थितीसमोर हात न टेकता वेळीच कठोर नियम लागू करत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या मध्ये सर्व व्हिसा रद्द करणे, भारतात बाहेरच्या देशांमधून कुणालाच एंट्री न मिळणे, जिम, मॉल्स, ऑफिसेस, सिनेमागृह, सार्वजनिक स्थळं बंद ठेवणे आदींचा समावेश आहे. मात्र जगभरातून भारताचं आणखी एका कारणासाठी कौतुक होतंय. ते म्हणजे भारताने कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतर देशांना देखील आवाहन करत या परिस्थितीला झुंझ देण्यासाठी ‘कोरोना आपात्कालीन फंडात’ आपला सहभाग नोंदवण्यासाठी म्हटले आहे. 


modiji_1  H x W


त्यांनी म्हटले आहे, या परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात भार येतो आहे, तसे होऊ नये यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. सर्व देशांनी जर स्वेच्छेने शक्य असेल तितके पैसे या फंडात जमा केले तर संपूर्ण जग एकत्र येऊन या परिस्थितीवर मात करु शकतं. त्यासाठी भारताने पुढाकार घेत १० मिलिअन डॉलर रुपये या फंडात स्वेच्छेने देण्याचे ठरविले आहे. यामुळे कोरोनावर लस तयार करण्यासाठी तसेच औषधोपचारांसाठी जगातील अर्थव्यवस्थेला बळ मिळेल असे पंतप्रधानांचे मत आहे. 



जगभरातून पंतप्रधान मोदींचे यासाठी कौतुक होत आहे. जे निर्णय इंग्लंड आणि अमेरिकाही इतक्या त्वरित घेऊ शकले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यामुळे सर्व स्तरातून पंतप्रधान मोदींची प्रशंसा होत आहे. पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना काळजी घेत, घरी राहून व योग्य ती स्वच्छता पाळून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0