मराठमोळ्या ‘मुरांब्याची’ गुजराती गोलकेरी

    08-Feb-2020
|

आपल्या सगळ्यांना अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांचा ‘मुरांबा’ चित्रपट आठवतो? अनेकांना खूप आवडलेल्या या चित्रपटाचा आता गुजराती रीमेक ‘गोलकेरी’ येत आहे. यामध्ये ‘ऊरी : द सर्जिकल स्ट्राइक’ फेम हिंदी आणि गुजराती अभिनेत्री मानसी पारेख आणि मल्हार ठाकुर प्रमुख भूमिकेत आहेत. तर आपले सगळ्यांचेच लाडके सचिन खेडेकर आणि छिचडी फेम वंदना पाठक आई वडीलांच्या भूमिकेत आहेत.

Golkeri_1  H x

मानसी या चित्रपटाची निर्माती देखील आहे. ‘एक कलाकारासोबत निर्माता असणं देखील खूप कठीण काम असतं आणि आव्हानास्पद देखील.’ असे ती म्हणते. या चित्रपटाचा ट्रेलर बघून लक्षात येतं कि चित्रपट मुरांबाचा कट टू कट रीमेक आहे. वंदना पाठक ला बघितल्यावर चिन्मयी सुमीतची आठवण ही येतेच.चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. गुजराती भाषा आपल्याला समजण्यास सोप्पी असते, त्यामुळए गुजराती प्रेक्षकांसह मराठी प्रेक्षकांना देखील याविषयी नक्कीच उत्सुकता आहे.