कशी वाटली मिथिला आणि प्राजक्ताची जोडी?

    06-Feb-2020
|

प्राजक्ता कोळी म्हणजे आपली लाडकी मोस्टली सेन इंटरनेटवर धुमाकूळ घालतेय. त्याचं कारण म्हणजे तिची पहिली यूट्यूब सीरीज ‘प्रिटी फिट’ आता पर्यंत तिच्या या सीरीजमध्ये सनाया मल्होत्रा आणि नेहा कक्कर यांनी देसी स्टाइलमध्ये फिटनेसचे धडे शिकवले आणि प्राजक्ताचे चॅलेंज एक्सेप्ट केले. या नंतर आता तिसऱ्या एपिसोडमध्ये सगळ्यांची लाडकी आणि प्राजक्ताची ‘वाईफी’ मिथिला पालकर हिने हजेरी लावली आहे. एकूणच हा तिसरा एपिसोड देखील खूप मजेदार आहे.


mithila_1  H x  


या भागात मिथिला आणि प्राजक्ता टिपिकल ‘मच्छी वाल्या’ म्हणजे कोळिणी झाल्या आहेत. मच्छी पकडण्यापासून ते विकण्यापर्यंतची पूर्ण प्रॉसेस या दोघींनी एकत्र केली. प्राजक्ता स्वत: कोळी असल्यामुळे तिचे हे लहानपणी पासूनचे स्वप्न होते कि तिला एकदा तरी मच्छी विकाची होती. या सीरीजमुळे तिचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे.


या सीरीज मध्ये प्राजक्ता कोळी, आरजे मलिष्का, करीना कपूर आणि सुमुखी सुरेश यांच्या सह हटके कामांच्या माध्यमातून फिटनेसला प्रमोट करताना दिसली आहे. सीरीजचे एपिसोड्स मनोरंजक आहेत.