कोरोना व्हायरस : चीनी आजी आजोबांचा हा ‘गुडबाय’ व्हिडियो होतोय व्हायरल

    05-Feb-2020
|

कोरोना व्हायरस ने चीन आणि एकूणच जगात मोठ्या प्रमाणात भिती निर्माण केली आहे. कोरोनामुळे चीन येथील हजारो लोकं जीवन आणि मृत्युशी झुंझ देत आहेत. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यु झाले आहेत, तर चीन येथील नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात आहे. चीनच्या वुहान या ठिकाणी सर्वात जास्त नुकसान झाले आहे. या सर्व घडामोडींमध्ये चीनच्या एका रुग्णालयातील या आजी आजोबांचा एक व्हिडियो व्हायरल झाला आहे, जो बघून कुणाचेही डोळे पाणावतील.


corona_1  H x W


या व्हिडियोमध्ये साधारण ८० + वयातील एक जोडपं दिसतंय, ज्यामध्ये दोघेही कोरोना व्हायरसमुळे आजारी आहेत. कदाचित यानंतर ते कधीच भेटणार नाहीत, अशी परिस्थिती यामध्ये दिसतेय. हा व्हिडियो आयसीयू मधील आहे, असे म्हटल्या जात आहे, मात्र याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.
कोरोनामुळे आजारी पडलेल्या भारतीयांना भारत सरकार चीनहून भारतात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताने एअरलिफ्ट करून तेथील भारतीय नागरिकांना वाचवून भारतात आणले आहे. इथे आल्यानंतर त्यांनी पूर्ण तपासणी करण्यात आली आहे. आता पर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरस मुळे सुमारे ५०० लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर २४ हजार हून अधिक लोक कोरोना व्हायरस ने आजारी आहेत.