मोदींनंतर आता रजनीकांत दिसणार ‘मॅन वर्सेस वाईल्ड’मध्ये, चाहत्यांची उत्सुकता शीगेला

    28-Feb-2020
|

तुम्ही कधी दोन थलाईवा एकत्र जंगलात बघितले आहेत? नाही ना? मग आता बघा. भारताचे थलाईवा रजनीकांत आणि जंगालाचा थलाईवा बेअर ग्रिल्स आता एकत्र मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये जंगल भ्रमण करताना दिसणार आहेत. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ‘शो’ मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी देखील प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. आता या कार्यक्रमात रजनीकांत दिसणार म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शीगेला पोहोचली आहे. हा कार्यक्रम २३ मार्च रोजी डिस्कव्हरी चॅनल वर प्रदर्शित होणार आहे.

 

thalaiva_1  H x


डिस्कव्हरी चॅनलने नुकतेच या भागाचा टीझर ट्विटर वर शेअर केला आहे, ज्यामध्ये कर्नाटकातील बांदीपुरा जंगलात मोटर बाईकवरुन फिरणारा बेअर ग्रिल्स दाखवला आहे, त्यानंतर रजनीकांत यांचा पूर्ण चेहरा न दाखवत केवळ त्यांचे गॉगल असलेले डोळे दिसताएत. एकूणच या टीझरमुळे या भागाविषयी आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून रजनीकांन टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करतायेत. त्यांच्या या धमाकेदार एंट्रीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. बेअर गिल्स आणि रजनीकांत या जोडीला बघण्यासाठी प्रेक्षक २३ मार्चची वाट बघताएत.