इंटरनेट वर गाजतंय ‘मदरहुड डेअर’

    21-Feb-2020
|motherhood_1  H

अनेकदा इंटरनेट वर, सोशल मीडिया वर अनेक चॅलेंजेस येतात आणि जातात, मात्र काही चॅलेंजेस असे असतात ते हिट होतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वर खासकरून फेसबुकवर मदरहुड डेअर चॅलेंज गाजतंय. या चॅलेंजमध्ये लोक एक मेकांचा टॅग करतायेत. हे चॅलेंज खासकरून मदर्ससाठी म्हणजेच आयांसाठी आहे. त्यांना आपल्या मुलांबद्दल काय वाटतं हे सांगण्यासाठी हे चॅलेंज आहे, ज्यामध्ये त्यांना आपल्या मुलांसोबतचा त्यांचा सगळ्यात आवडता एक, हो केवळ एकच फोटो पोस्ट करायचा आहेत.

 

 

सोशल मीडियावर एक खूप मोठी मदर्स कम्युनिटी आहे. ज्या त्यांच्या या मातृत्वाच्या प्रवासाविषयी भरपूर काही शेअर करतात. हे चॅलेंज अशाच एका कम्युनिटी पासून सुरु झालं आहे, आणि आता मात्र हे व्हायरल होत आहे. अनेक लोक आपल्या मुलांसोबतचे फोटोज पोस्ट करताएत. 


मध्ये अशाच प्रकारचे एक डान्सर्स चॅलेंज आले होते ज्यामध्ये १० दिवसांपर्यंत नृत्य कलाकारांनी आपले नृत्य करतानाचा, स्टेजवरचा एक फोटो रोज शेअर करायचा होता. हे चॅलेंज देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले होते. आता या मदरहुड चॅलेंजनंतर कुठले चॅलेंज येते हे बघणं मनोरंजक असेल.