बापू, थोड बोलाव वाटल म्हणून...

    02-Oct-2020
|

mahatma gandhi  4_1 
 
प्रिय बापू ,
 
कसे अहात ? खरं तर हे विचारणं योग्य होणार नाही कारण जेव्हा स्वर्गात बसून तुम्ही तुमच्या प्रिय देशाकडे पहात असाल तर नक्कीच हळहळ वाटत असेल, हो ना.. बापू मी अजून ही तुमची सत्य आणि अहिंसा ही शिकवण विसरलेलो नाही. पण बापू आज देशाची अवस्था पाहता बाकी सगळे नक्कीच विसरले आहेत असं वाटतंय.
 
बापू इथे सत्याच बोलबाला आहे, खून, दरोडे, भ्रष्टाचार याची कमी तर नाहीच पण बलात्कार सारखी भयानक कृत तर लोक सर्रास करत आहेत. निर्भया पासून ते मनिषा कितीही वर्ष लोटली तरी लोकांची मानसिकता बदलतच नाही ये बापू.
 
बापू आज तुम्ही हवे होता. आज अन्यायाला रोखण्यासाठी झोपल्या डोळ्यांना जाग करण्यासाठी बापू आज तुम्ही हवे होता... बस इतकच बोलावस वाटला...
 
 
 
- अमर