“हॅप्पी बर्थडे लेजेंड”.. बघा रणवीर काय म्हणतोय

    06-Jan-2020
|

आज हरियाणा हॅरिकेन म्हणजेच कपिल देव यांचा वाढदिवस. या निमित्ताने अभिनेता रणवीर सिंह याने त्यांना अभिनंदन देत त्यांच्या फेमस नटराज मुद्रेतला फोटो शेअर केला आहे. त्याने लिहीले आहे, “Happy Birthday Legend, Thanks for showing us the way.” कपिल देव यांच्या बायोपिक आणि १९८३ च्या विश्वचषकावर आधारित चित्रपटात मुख्यभूमिकेत रणवीर सिंह दिसणार आहे, सेटवरील काही फोटोज त्याने शेअर केले आहेत.


kapil dev ranveer_1 


कपिल देव यांची बायोपिक “८३” येणार ही बातमी आल्या आल्या यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, आणि तेव्हा पासूनच रणवीर आणि कपिल देव यांचे अनेक फोटोज इंटरनेट वर व्हायरल झाले आहेत. आणि आज कपिल देव यांच्या वाढदिवसानिमित्त रणवीर ने शेअर केलेल्या फोटोज मुळे रणवीर आणि देव यांच्या फॅन्सना तर मोठे गिफ्ट मिळाले आहे.

 
८३ या चित्रपटात रणीवर सिंह यांच्या सोबत त्यांच्या ऑफस्क्रीन पत्नी म्हणजेच दीपिका पादुकोण दिसणार आहे. एका मुलाखतीत रणवीरने गमतीत म्हटले होते कि, “या चित्रपटात दीपिका आणि मी रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारखे शेवटी वेगळे होणार नाही.” रणवीर आणि कपिल देव यांच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता आहे.