Brave and Beautiful : फेमिनाच्या कव्हर वर लक्ष्मी आणि दीपिका

    06-Jan-2020
|
गेल्या काही दिवसांपासून दीपिका पदुकोणच्या “छपाक” या चित्रपचाविषयी भरपूर चर्चा सुरु आहे. त्याचमुळे पुन्हा एकदा एसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवाल हिच्या कहाणीची उजळणी झाली आहे, आणि लक्ष्मी आणि दीपिका एकत्र इंटरनेटवर ट्रेंड करतायेत. त्यातच आज दीपिका ने प्रसिद्ध सेलेब्रिटी मॅगझीन फेमिनाचे कव्हर इंस्टाग्राम वर शेअर केले आहे, ज्यामध्ये ती आणि लक्ष्मी प्रसन्न मुद्रेत दिसतायेत. ‘छपाक’ या चित्रपटाचे ट्रेलर आणि आता काही गाणी आल्यानंतर याविषयी मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे.  Brave and Beautiful लक्ष्मी आणि दीपिका या कव्हर मध्ये खूपच छान दिसतायेत. 
 
 
deepika_1  H x

 
छपाक हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी म्हणजेच ३ दिवसांनी प्रदर्शित करण्यात येणार आहे. चाहत्यांच्या मनात या चित्रपटाविषयी भरपूर उत्सुकता निर्माण झालेली आहे. या चित्रपटातील दीपिकाचा लुक आणि एकूणच चित्रपटाची कथा, आणि मांडणी कशी असेल याविषयी प्रत्येकच प्रेक्षकाच्या मनात उत्सुकता आहे.
छपाक ही लक्ष्मी अग्रवाल या एसिड अटॅक सर्व्हायवरची कथा आहे. २००५ मध्ये लक्ष्मीवर एसिड हल्ला झाला, आणि त्यानंतर तिचे आयुष्यच बदलले. मात्र तिने हार मानली नाही. लक्ष्मी आजही एसिड विक्रीच्या विरोधात कार्यरत आहे, आणि तिला अनेक पुरस्कार देउन सन्मानित देखील करण्यात आले आहे. तिची कथा रुपेरी पडद्यावर ‘मालती’ या नावाने दीपिका साकारणार आहे. दीपिकाने या चित्रपटातील तिचा पहिला लुक शेअर केला होता तेव्हा पासूनच याविषयी भरपूर चर्चा सुरु आहे. हा चित्रपट करणे आणि मालती साकारणे आतापर्यंतचे सगळ्यात कठीण आणि तितकेच स्पेशल कार्य होते, असं दीपिका सांगते.