मुलाचे पहिले पाऊल देशाच्या मातीवर पडावे यासाठी केले २०० डॉलर्स खर्च

29 Jan 2020 13:00:00

 

tony_1  H x W:



ही कथा आहे अमेरिकेच्या सैन्यातील एका जवानाची. सामान्य माणसालाच आपल्या देशाबद्दल इतका अभिमान असतो मग वीर जवानांना किती असेल. अमेरिकी सेनेचे पॅराट्रूपर जवान टोनी ट्रिकोनी यांची इच्छा होती कि जेव्हा त्यांचे मूल जन्माला येईल त्यानंतर त्याचे पहिले पाऊल देशाच्या मातीवर पडले पाहिजे. मात्र त्यांची पत्नी गरोदर राहिल्यानंतर त्यांची बदली इटली येथे करण्यात आली. त्यांची आशा होती कि मुलाच्या जन्मापर्यंत ते मायदेशी परत जाऊ शकतील. मात्र तसे झाले नाही, आणि त्यानंतर त्यांनी आपल्या देशाच्या मातीवर आपल्या नवजात मुलाची पावले पडावी यासाठी तब्बल २०० डॉलर्स खर्च केले. या घटनेमुळे अनेक लोक भावुक झाले आहेत. 


टोनी यांनी डिलिव्हरीच्या एक महिना अगोदर अमेरिकेच्या टेक्सासची माती इटली येथे मागवली. त्याची इच्छा होती कि, त्याच्या बाळाची पावले पहिल्यांदा त्या मातीवर पडली पाहिजेत जिथे त्याचे आई वडील जन्मले. यासाठी तब्बल २०० डॉलर्स रुपये खर्च करत त्याने आपल्या देशाची माती कुरिअरच्या माध्याने मागवली. 



जेव्हा बाळाला खोलीत आणण्यात आले तेव्हा टोनी यांनी आपल्या बाळाच्या बिछान्या खाली ही माती ठेवली. आणि अशा पद्धतीने त्याच्या बाळाचे पहिले पाऊल त्याच्या मायदेशाच्या मातीवर पडले. म्हणायला साधीच अशी ही गोष्ट खूप काही सांगून जाते.

Powered By Sangraha 9.0