ओळख खेळाडूंची - १ रवी शास्त्री - भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक

    25-Jan-2020
|
ravi_1  H x W:


"In the air, Sreesanth takes it!! India win"

 

" Dhoni! finishes off in style, a magnificent strike into the crowd"

हे शब्द ऐकल्यावर आपल्या मनात एकाच व्यक्तीचा विचार येतो, ती व्यक्ती जी भारताच्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी समालोचन करत असे.

बरोबर ओळखलंत, रवी शास्त्री - प्रत्येक महत्वाच्या क्षणांमध्ये सहभागी असलेला माणूस.

खेळाडू म्हणून कारकीर्द-

खेळाडू म्हणून रवीच्या आयुष्यात खूप उतार-चढाव आले. कारकीर्दीची सुरुवात त्यांनी डावखुरा फिरकीपटू म्हणून केली केली व शेवट अष्टपैलू खेळाडू म्हणून झाला. टेस्ट मॅचेस मध्ये 11 शतके व एकदिवसीय सामन्यात ४ शतकं, शास्त्री हा नक्कीच चांगला फलंदाज होता. वाचुन थोडंसं विचित्र वाटेल, पण शास्त्रीने संघात प्रत्येक स्थानी फलंदाजी केलेली आहे. शेवटच्या नंबरला फलंदाजी करण्यापासून ते डावाची सुरुवात करण्यापर्यंत शास्त्रीला सर्व प्रकारचे अनुभव आहेत. तो ज्याच्या चपाती शॉट साठी ओळखला जायचा. त्याच्या उत्तम गोलंदाजीमुळे त्याला ८० टेस्ट मॅचेस मध्ये १५१ विकेट मिळाल्या व १५० एक दिवसीय मॅचेस मध्ये त्यांनी १०९ विकेट घेतल्या आहेत. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने संघात एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले होते पण अनेक दुखापतीमुळे त्याला १९९२ साली निवृत्त व्हावे लागले.

ravi_1  H x W:

थेट कॉमेंट्री बॉक्समधून-

आमच्या पिढीला रवी शास्त्री हा खेळाडू पेक्षा समालोचक म्हणून जास्त माहिती आहे. रवी शास्त्री हर्षा भोगले व सुनिल गावस्कर यांना एकत्र ऐकणं हे प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या स्वप्न असे. रवी बद्दल बोलायचे झाले तर समालोचन करताना तो प्रत्येक बघणार्‍याला व ऐकणाऱ्याला खेळात गुंतवून ठेवत असेल. त्याच्या समालोचन कधीच कंटाळवाणं व रटाळ झालं नाही. भारतीय क्रिकेटचे कुठलेही महत्त्वाचे क्षण बघा, रवी शास्त्री सेक्सी व्हिडीओ जवळ जवळ सगळ्या क्षणांना समालोचन करत होता. 2007 चा t20 वर्ल्ड कप घ्या, ती टेस्ट मॅच आठवा जी जिंकून भारताने जगात पहिले स्थान मिळवले, 2011 चा विश्वचषक आठवा, रवी शास्त्री आपल्याला सगळीकडेच दिसेल. त्याने प्रत्येक महत्त्वाचा क्षण एका वेगळ्याच गोडव्याने सजवला आहे.


ravi_1  H x W:

भारतीय संघाचा प्रशिक्षक-

प्रशिक्षणाचे काम रवी शास्त्रीने पहिल्यांदा 2007 सही बांगलादेश दौऱ्यासाठी केले होते. त्यानंतर थेट राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षण पदाची कामगिरी त्याच्याकडे 2017 साली सोपवली गेली.

रवी शास्त्री व विराट कोहली या जोडीने भारतीय क्रिकेटला एक वेगळाच नवा चेहरा निर्माण करून दिला. भारतीय संघाची कामगिरी परदेशी दौऱ्यावर सुद्धा अप्रतिम होऊ लागली. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला ऑस्ट्रेलियात हरवण्याची मोठी कामगिरी भारतीय संघाने रवी शास्त्री च्या प्रशिक्षणाखाली केली. प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री कडे सर्व उत्तम खेळाडू आहेत. त्या खेळाडूंचा योग्य उपयोग रवी शास्त्री नक्कीच करत आहे आणि पुढेही करेल. रवी शास्त्री च्या प्रशिक्षणाचा फायदा भारतीय संघाला नक्की होईल व भारतीय संघाची अशीच प्रगती होत राहील हीच सर्वांची इच्छा आहे.