अक्षय कुमार ने आपल्या पत्नीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या ‘भयानक’ शुभेच्छा

    17-Jan-2020
|

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या जोडीबद्दल कुणाला माहित नाही? अक्षय त्याच्या कॉमेडीमुळे आणि ट्विंकल तिच्या सार्केस्टिक बोलण्यामुळे प्रसिद्ध आहे. तर अशा या आगळ्या वेगळ्या जोडीच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. आणि या लग्नाच्या वाढविसाच्या अक्षय ने आपल्या पत्नीला ‘भयानक’ शुभेच्छा दिल्या आहेत. म्हणजेच एक अतिशय भयानक पण मजेशीर फोटो शेअर करत त्याने आपल्या ‘टीना’ला शुभेच्छा दिल्या आहेत.

akshay_1  H x W

रोबोट २.० मधील स्वत:चा एक फोटो शेअर करत त्याने टीनाला म्हटले आहे कि, Visual representation of what married life looks like...some days you wanna cuddle and some days look like...as you can see 😜 ‬All said and done, I wouldn’t have it any other way, Happy Anniversary Tina...with love from Pakshirajan.”लग्नाचे व्हिजुअल प्रेजेंटेशन कसे असते ते या फोटो मधून अक्षय दाखवतोय.” म्हणजे लाड करण्यापासून ते… तुम्ही बघूच शकता. सगळंकाही बोलून आणि करुन झालंय आणि मला हे असंच हवं होतं. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा टीना. पक्षीराजन कडून.” असं म्हणत त्याने टीना म्हणजेच ट्विंकलला शुभेच्छा दिल्या आहेत.


आहे कि नाही मजेशीर.