मुक्ता बर्वे आणि काजोल करणार एकत्र काम, या ही अभिनेत्री आहेत ‘देवी’ या लघुपटात

    16-Jan-2020
|

नुकतेच मुक्ता बर्वे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम वर एक पोस्टर शेअर केले आणि एकच संपूर्ण इंटरनेट वर चर्चा सुरु झाली. या पोस्टर मध्ये मुक्त बर्वे या काजोल सोबत दिसल्या आहेत. तर या दोघींसोबत श्रुति हासन, नेहा धूपिया, नीना कुलकर्णी, रमा जोशी, संध्या म्हात्रे, शिवानी रघुवंशी, यशस्विनी दायमा यांनी देखील ‘देवी’ या लघुपटात अभिनय केला आहे. मुक्ता बर्वे यांच्या या पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 
 

devi_1  H x W:  

लघुपटाची कथा लिहीली आहे प्रियंका बॅनर्जी यांनी आणि दिग्दर्शन देखील त्यांनीच केले आहे. लघुपटाविषयी अजून पूर्ण माहिती मिळालेली नाही, मात्र एकूणच या ९ स्त्रियांची कहाणी या लघुपटातून दाखवण्यात आली असणार असे हे पोस्टर बघून लक्षात येते. या मध्ये अगदी वेगवेगळ्या धाटणीचा अभिनय करणाऱ्या कलाकार आहेत. श्रुति हासन, नेहा धूपिया आणि राजोल बॉलिवुड मधून तर नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, संध्या म्हात्रे, रमा जोशी या मराठी तारका, शिवानी यशस्विनी दायमा या प्रसिद्ध वेब कलाकार आहेत. यशस्विनी दायमाला तिच्या ‘अडल्टिंग’ या वेबसीरीजमुळे सर्व तरुण ओळखतात. एकूणच या सर्वांना एकत्र एका लघुपटात बघणं, खूप मनोरंजक असेल.