शंकर महादेवन यांनी शोधून काढला हीरा..

    11-Jan-2020
|


mahadevan_1  H

या देशात अनेक टॅलेंट्स लपलेले आहेत. लोक कलाकारांच्या माध्यमातून मोठ मोठ्या प्रतिभा आजवर जगासमोर आल्या आहेत, मात्र एखाद्या प्रसिद्ध कलाकाराने या लोककलाकारांची प्रतिभा जगासमोर आणणे म्हणजे मोठी बाब आहे, अशीच एक घटना नुकतीच घडली. शंकर महादेवन यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा व्हिडियो शेअर केला आहे.

 


तर त्याचे झाले असे कि, “ शंकर महादेवन” हे ब्रेकफास्ट साठी एका रेस्टॉरेंटमध्ये गेले असताना त्यांना हा बासुरीवादक भेटला. त्याच्या या कलेमुळे शंकर महादेवन अतिशय प्रभावित झाले, आणि त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या कलाकाराचे व्हीडियो शेअर केला. 

या हिऱ्याचे नाव आहे ‘दिलीप हीरा’. दिलीप आसामचा आहे आणि तो अतिशय सुरेख बासरी वाजवतो. हा व्हिडियो पाहून आपल्यालाही त्याच्या कलेचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. शंकर महादेवन सारख्या इतक्या मोठ्या गायकाने त्याची प्रशंसा करणे म्हणजे मोठी बाब आहे.